भडगावच्या ‘त्या’ शिक्षकाची पत्नी बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

गडहिंग्लज - आंबोलीच्या कावळेसाद दरीमध्ये मृतदेह मिळालेल्या भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील रहिवाशी व हिडदुग्गी हायस्कूलचे शिक्षक विजयकुमार गुरव यांची पत्नी जयलक्ष्मी विजयकुमार गुरव (वय ३६) ही मंगळवारी (ता. २१) दुपारी मागच्या दाराने बेपत्ता झाली. 

गडहिंग्लज - आंबोलीच्या कावळेसाद दरीमध्ये मृतदेह मिळालेल्या भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील रहिवाशी व हिडदुग्गी हायस्कूलचे शिक्षक विजयकुमार गुरव यांची पत्नी जयलक्ष्मी विजयकुमार गुरव (वय ३६) ही मंगळवारी (ता. २१) दुपारी मागच्या दाराने बेपत्ता झाली. 

मंगळवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास जयलक्ष्मीने शौचास जाऊन येतो, असे सांगून मागच्या दाराने निघून गेली. तिचा शोध घेऊनही ती कोठेही आढळली नसल्याने विजयकुमार यांची बहीण सौ. सरला गुरव (हलकर्णी) यांनी आज पोलिसांत फिर्याद दिली. सोमवारी (ता. ६) रात्री अकराच्या सुमारास विजयकुमार गुरव घरातून बेपत्ता झाले. तशी फिर्याद त्यांच्या मुलाने पोलिसांत दिली.

दरम्यान, शनिवारी (ता. ११) आंबोलीतील कावळेसाद जवळच्या दरीमध्ये एक मृतदेह सापडला. ही बातमी समजताच केवळ संशयाने येथील पोलिस गुरव यांच्या मुलासह इतर नातेवाईकांना सोबत घेऊन मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी ओरोसला घेऊन गेले. त्या वेळी मृतदेहाच्या हातातील दोरा व वाकड्या बोटावरून हा मृतदेह वडील विजयकुमार यांचाच असल्याचे मुलाने ओळखले. मुळात हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. केवळ दोरा व बोटावरून मृतदेह गुरव यांचाच असल्याचे पोलिस मान्य करायला तयार नव्हते. म्हणूनच पोलिसांनी डीएनए चाचणी केल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. 

डीएनए अहवाल कधी येणार?
पंधरा दिवसांपूर्वी गुरव बेपत्ता झाले. आंबोलीतील मृतदेह सापडल्यानंतर डीएनए तपासणीसाठी रक्त पाठवून आठवडा उलटला. अजूनही डीएनए तपासणीचा अहवाल आलेला नाही. यामुळे गुरव यांच्या नातेवाइकांकडून नाराजीचा सूर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Teachers wife missing from Bhadgaon