टीईटीकडे शिक्षकांनी फिरवली पाठ 

बुधवार, 30 ऑगस्ट 2017

शिरोली पुलाची - नोकरीची शाश्वती नसल्याने राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेकडे (टीईटी) शिक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. राज्यात पहिल्या वर्षी सुमारे सात लाख, तर या वर्षी फक्त तीन लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. सुमारे दहा लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवल्याची चर्चा शिक्षण विभागात सुरू आहे. नोकरीची नसलेली हमी, निकालाची घसरणारी टक्केवारी याचा परिणाम परीक्षार्थी संख्येवर झाला आहे. परीक्षार्थींची संख्या मागच्या तीन-चार वर्षांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घसरली आहे. 

शिरोली पुलाची - नोकरीची शाश्वती नसल्याने राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेकडे (टीईटी) शिक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. राज्यात पहिल्या वर्षी सुमारे सात लाख, तर या वर्षी फक्त तीन लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. सुमारे दहा लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवल्याची चर्चा शिक्षण विभागात सुरू आहे. नोकरीची नसलेली हमी, निकालाची घसरणारी टक्केवारी याचा परिणाम परीक्षार्थी संख्येवर झाला आहे. परीक्षार्थींची संख्या मागच्या तीन-चार वर्षांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घसरली आहे. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा घेतली जाते. राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2013 पासून सुरू झाली. डीएड, बीएडधारकांना शिक्षक म्हणून नोकरी मिळवण्यासाठी टीईटीची सक्ती केली. त्यामुळे पहिल्यावर्षी राज्यातील सात लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. ही पात्रता परीक्षा असतानाही काही संस्थांनी तीला स्पर्धा परीक्षेचे स्वरूप दिले. त्यामुळे परीक्षेत कोण पुढे व कोण मागे अशी स्पर्धा शिक्षकांत सुरु झाली; मात्र पहिल्या वर्षी परीक्षेचा निकाल केवळ पाच टक्के लागला. त्यामुळे भावी शिक्षकांची गुणवत्ता समोर आली. त्यानंतर प्रत्यक वर्षी परीक्षार्थांच्या संख्येत घट होत आहे. या वर्षी केवळ 2 लाख 97 हजार 245 डीटीएड, बीएडधारक ही परीक्षा दिली आहे. 2013 चे सुमारे सात लाख परीक्षार्थी व त्यानंतर गेल्या चार वर्षातील सुमारे चार लाख डीएड, बीएडधारक असे सुमारे 11 लाख शिक्षक नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. तीन लाख शिक्षकांनी परीक्षेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. 

राज्यात 2008पासून शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच टीईटी निकालाची टक्केवारी दोन अंकी आकडाही गाठू शकली नाही. 

दहा लाखांवर बेरोजगार 
राज्यात 2008नंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे डीटीएड, बीएड बेरोजगारांच्या संख्येत मोठी वाढ आहे. राज्यात सुमारे नऊ लाख डीटीएडधारक तर, सहा लाख बीएडधारकांची संख्या आहे. एवढी मोठी संख्या असताना शिक्षक भरती मात्र केली जात नाही. 2008नंतर राज्यात शिक्षक भरतीसाठीची सीईटीच झालेली नाही. नोकरीची हमी नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद फारसा नाही. 

शासनाच्या धोरणाचा निषेध 
टीईटीकडे डीएड व बीएड बेरोजगारांनी पाठ फिरविल्याने बेरोजगारांवर काही शिक्षणतज्ज्ञ टीका करीत आहेत. अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीमुळेच परीक्षेकडे पाठ फिरविल्याचे त्यांचे विधान आहे; मात्र वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे बेरोजगारांनी सांगितले. 2010 पासून प्राथमिक शिक्षकांची भरती झालेली नाही. दर वर्षी पदविका धारण करणाऱ्यांची संख्या हजारोंनी वाढते आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध जाचक नियमांमुळे शिक्षक अतिरिक्‍त ठरले आहेत. शिक्षक भरती होईल, याची शाश्‍वतीच नाही. टीईटीचे परीक्षा शुल्कही अधिक आहे. यामुळेच पाठ फिरवून शासनाच्या धोरणाचा निषेध केल्याच्या प्रतिक्रिया बेरोजगारांनी दिल्या. 

टीईटी पास झाल्यानंतर सात वर्षात शिक्षक म्हणून नोकरी मिळणे गरजेचे आहे; मात्र शासनाच्या धोरणाने शिक्षकांची भरती बेरोजगारांच्या यादीत होत आहे. त्यामुळेच टीईटीकडे शिक्षकांनी पाठ फिरवली आहे. 
एस. डी. लाड, जिल्हाध्यक्ष, शैक्षणिक व्यासपीठ. 

Web Title: kolhapur news TET teacher