इचलकरंजीत "टेक्‍सपोजर - 2018' प्रदर्शन 11 पासून 

इचलकरंजीत  "टेक्‍सपोजर - 2018' प्रदर्शन 11 पासून 

इचलकरंजी - इचलकरंजीतील वस्त्रोद्योगास चालना मिळावी यासाठी रोटरी क्‍लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि डीकेटीई सोसायटीचे टेक्‍स्टाईल ऍण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटतर्फे "टेक्‍सपोजर - 2018' या राष्ट्रीय वस्त्रोद्योग यंत्र प्रदर्शनाचे आयोजन आले आहे.

11 ते 14 जानेवारी या कालावधीत बसवेश्‍वर गार्डन, शिवमंदीर, मॉर्डन हायस्कूल शेजारी हे प्रदर्शन भरणार आहे. 11 जानेवारीला सकाळी प्रदर्शनाचे उद्घाटन टेक्‍स्टाईल मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार सुरेश हाळवणकर, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, डीस्ट्रीक्‍ट गर्व्हर्नर रो. आनंद कुलकर्णी, नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. 

शहर व परिसरात सध्या 12000 शटललेस लूम आणि 20,000 ऍटोमेटीक लूम्स, तसेच 1 लाख साधे यंत्रमाग कार्यरत आहेत. त्याचबरोबर शहरात 160 सायझिंग युनीटस, 75 प्रोसेसिंग युनिट व 100 गारमेंट उत्पादन करणारे युनिटस कार्यरत आहेत. 

इचलकरंजीमध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने व इंडस्ट्रीजच्या वाढीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे येथे हायटेक टेक्‍स्टाईल पार्क्‍स व गारमेंट पार्कस स्थापन झाले आहेत. वस्त्रोद्योगास गती देण्यासाठी "पॉवरलूम मेगा क्‍लस्टर' भारत सरकारने मंजूर केलेली आहे. जागतिक स्तरावर होत असलेले वस्त्रोद्योगातील विविध बदल व त्याबाबत वस्त्रोद्योगांनी करावयाची तयारी हा अतिशय महत्वाचा विषय आहे. या विषयावर विविध तज्ञांमार्फत मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी डीकेटीईतर्फे चर्चा सत्रे, कार्यशाळा तसेच परिषदांचे आयोजन केले जाते. अशा सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून डीकेटीई आणि रोटरी क्‍लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने 'टेक्‍स्पोजर - 2018' हा व्यावसायिक उपक्रम आयोजिला आहे. 

पत्रकार परिषदेस रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष प्रदीप गांधी, सचिव किसन जाधव, इंव्हेट चेअरमन अंबरीश सारडा, डीकेटीईचे डायरेक्‍टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, पुरुषोत्तम बोहरा, अजय जाखोटिया, अमर डोंगरे, सीए नरेंद्र पुरोहित, नितिन धूत, ओमप्रकाश भराडिया, नागेश दिवटे, डे. डायरेक्‍टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील, प्रा. एस.बी. म्हेत्रे, प्रा. ए.यु. अवसरे आदी उपस्थित होते. 

प्रदर्शनाविषयी... 
या प्रदर्शनात पिकॅनॉल - बेल्जियम, सुडोकोमा व टोयोटा- जपान, इटेमा-युरोप, लुवा - स्वित्झर्लंड, ऍटलास कॉपको, कायझर व कोबेल्को कॉम्प्रेसर, डॉजीटेक व रिफा - चायना, कलर जेट, कार्लमेयर, जनलर मशीन टूल्स, टाकायामा व शॉक रीडस आणि थरमॅक्‍स बॉयलर इत्यादी सुमारे 200 हून अधिक स्टॉलचा सहभाग असणार आहे. प्रदर्शनास मुंबई, अहमदाबाद, सुरत, बेंगलोर, दिल्ली, पुणे, कोईमतूर, सोलापूर, भिवंडी, ठाणे ठिकाणाहून वस्त्रोद्योजक भेटी देणार आहेत तसेच परदेशातून चीन, जपान, जर्मनी या देशातील तज्ञ भेट देणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com