कोल्हापूरमध्ये ३ दिवस १७ घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

कोल्हापूर : आज कोल्हापूरकरांची पहाट एका शेजारी एक असणाऱ्या ११ घरफोड्यानी उजाडली. गेल्या ३ दिवसांपासून शहरात घरफोड्यांचे सत्र सुरु आहे.

या चाललेल्या प्रकारामध्ये पोलिस देखील हतबल झाले असल्याचे चित्र आहे. नेमके कोणते घर कधी बंद असते हे हेरणारी चोरांची टोळी हि पोलिसांपेक्षा अधिक कार्यक्षम असल्याचे सध्याच्या घरफोड्यांच्या सत्रावरून दिसत आहे. याच बरोबर चोर देखील अधिक 'डोकं' लावून चोरी करत असल्याचे दिसत आहे.

देवकरपानंद परिसरातील बंगल्यामध्ये चोरी करण्यापूर्वी पाळलेल्या कुत्र्यालाच गुंगीचे औषध दिले होते. आज (गुरुवार) ११ घरे फोडून थेट यंत्रणेलाच आव्हान दिले आहे. चोरी झालेल्या परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती. तर तिथे चाललेली चर्चा मजेशीर मात्र खरोखरच विचार करायला लावणारी अशी होती. "चोरांना नेमकी चोरी करायची आहे कि रेकॉर्ड बनवायचे आहे हेच कळंना झालाय". असे म्हणताच बाकीच्यांच्यात हशा पिकला. मात्र, पोलिसांवर अजूनही 'मन मै हे विश्वास' असे देखील आवर्जून बोलायला मात्र हि मंडळी विसरली नाहीत.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'बीड-परळी रेल्वेच्या कामाला तीन जूनपासून होणार सुरुवात'
नाशिक : दिंडोरी तालुक्यात दूध, आंब्याचे ट्रक अडविले​
पालकांपासून बचाव करण्यासाठी तावडेंभोवती 'सुरक्षा कडे'
एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​
शेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा: रामदास फुटाणे
सोलापूरात फुले रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा संपात सहभाग
शेतकरी संपावर अन् सरकार शांत कसे?: धनंजय मुंडे
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी
अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला

Web Title: kolhapur news theft, crime and police