बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी कोल्हापूरजवळ तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 डिसेंबर 2017

कोल्हापूर -  वर्षाखेर अर्थात 31 डिसेंबरसाठी गोव्या बनावटीची दारू कर चुकवून महाराष्ट्रात आणण्याऱ्या तिघांना आज राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली.

कोल्हापूर -  वर्षाखेर अर्थात 31 डिसेंबरसाठी गोव्या बनावटीची दारू कर चुकवून महाराष्ट्रात आणण्याऱ्यां तिघांना आज गवसे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली.

कारवाईत सुमारे दहा लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला. आप्पा विठोबा भोसले (वय 50, रा.हिंडगाव, ता.चंदगड,जि.कोल्हापूर), लक्ष्मण सखोबा गावडे (48,नागनवाडी,ता.चंदगड) आणि शंकर राणबा दळवी (वय.46,करंजगाव,ता.चंदगड,जि.कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

वर्षाखेर असल्यामुळे गोवा बनावटीची दारू कर चुकवून महाराष्ट्रात आणली जात आहे. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्रीमती संगीता दरेकर यांना मिळाली. त्यांनी भरारी पथकाला दिलेल्या आदेशानुसार गवसे (ता.चंदगड) येथे छापा टाकला. तेथे भारतीय बनावटीचे विदेशी व विविध ब्रॅण्डच्या दारूचे 215 बॉक्‍स जप्त केले. याची अंदाजे किंमत दहा लाख 45 हजार 920 रुपये आहे. यामध्ये भोसले याला अटक केली.

निरीक्षक वाय.एस.शिंदे यांनी ही कारवाई केली. तसेच नागनवाडी व करंजगाव (ता.चंदगड,जि.कोल्हापूर) येथेही 16 हजार 840 रुपयांची दारू पकडली. दुय्यम निरीक्षक एस.एम.परळे यांनी ही कारवाई करून गावडे आणि दळवी यांना अटक केली. 

Web Title: Kolhapur News Three arrested In case of illegal liquor transport