इचलकरंजीत जबरी चोऱ्या प्रकरणी तिघांना अटक

राजेंद्र होळकर
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

इचलकरंजी - येथील शहापूर पोलिसांनी जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि वाहने चोरणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील तिघा गुन्हेगारांना अटक केली. नागेश हणमंत शिंदे (वय 24, रा.गल्ली नं.3, गणेशनगर, शहापूर), चंद्रकांत दयानंद शिंदे (वय 21, रा.गल्ली नं.4, गणेशनगर, शहापूर), दिपक चंद्रकांत कांबळे (वय 23, रा.महात्मा फुले हौसिंग सोसायटी, शहापूर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

इचलकरंजी - येथील शहापूर पोलिसांनी जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि वाहने चोरणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील तिघा गुन्हेगारांना अटक केली. नागेश हणमंत शिंदे (वय 24, रा.गल्ली नं.3, गणेशनगर, शहापूर), चंद्रकांत दयानंद शिंदे (वय 21, रा.गल्ली नं.4, गणेशनगर, शहापूर), दिपक चंद्रकांत कांबळे (वय 23, रा.महात्मा फुले हौसिंग सोसायटी, शहापूर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

त्यांच्याकडून चोऱ्या करताना वापरलेली एका मोटरसायकलीसह एक अॅटो रिक्षा, दोन मोटरसायकली जप्त करण्यात आली आहेत. त्यांनी दोन घरफोडीच्या गुन्ह्यासह दोन जबरी चोरी असे एकूण सात गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून सुमारे 2 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाटगे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

या पत्रकार बैठकीवेळी पोलीस उपाधिक्षक विनायक नरळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज कवडे, पोलीस उपनिरीक्षक रियाज मुजावर आदी उपस्थित होते.

अप्पर पोलीस अधिक्षक श्री घाटगे म्हणाले, ""शहर आणि उपनगरातून गेल्या काही दिवसापासून सुताचे कोन आणि सुताची बाचकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. या वाढत्या सुताच्या बाचक्‍याच्या चोरीचा छडा लावावा. याकरीता येथील यंत्रमाग उद्योजकांनी पोलीस ठाण्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चे काढून निवेदने दिली होती. यांची दखल घेवून अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाटगे, पोलीस उपाधिक्षक विनायक नरळे यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना अशा चोरीच्या गुन्ह्यांचा छेडा लावण्याबाबत सक्त सुचना दिल्या होत्या.""

याच दरम्यान शहापूर पोलिसाना त्यांच्या हद्दीमधील शहापूर येथील यंत्रमाग उद्योजक अमृत आप्पाण्णा सुळकुडे यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या मोपेडवरील 12 हजार रुपये किंमतीची सुताची बाचकी पळवून नेली होती. ही जबरी चोरी पोलीस रेकॉर्डवरील नागेश शिंदे, चंद्रकांत शिंदे, दिपक कांबळे या तिघांनी केल्याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना मिळाली. त्यावरुन त्यांनी त्या तिघांचा शोध सुरु केला.

या शोधावेळी हे तिघेही शहापूर चौकातून एका मोटर सायकलवरुन जात असताना दिसून आले. पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना पकडले. त्यांना खाक्‍या दाखविताच त्यांनी शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन घरफोड्या बरोबर दोन जबरी चोऱ्या आणि एक मोटरसायकल तर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक मोटरसायकल आणि कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक रिक्षा चोरल्याचे कबूल केले. त्यावरुन पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील एक अॅटो रिक्षा, दोन मोटरसायकली, दोन घरफोडी मधील आणि जबरी चोरीतील सुमारे 96 हजारांची सुताचे कोन असा सुमारे 2 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक मनोज कवडे, सहाय्यक फौजदार कमलसिंग रजपूत, सुरेश कोरवी, तानाजी गुरव, कॉन्स्टेबल सुकुमार बरगाले, शब्बीर बोजगर, राजू पाटील, उदय करडे, इम्तीयाज कोठीवाले, अमर कदम, अमर पाटील, आबा चौधर, राम पाटील, अर्जुन कोकाटे, प्रकाश कांबळे आदीनी भाग घेतला होता, असे सांगितले.

Web Title: Kolhapur News Three arrested in robbery cases