खंडणी मागणाऱ्या तिघा फाळकूटदादांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

कोल्हापूर -  उजळाईवाडी (ता. करवीर) येथील पानटपरी चालकाकडे खंडणी मागणाऱ्या तिघा संशयित फाळकूटदादांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. राजारामपुरीत सापळा रचून आजही कारवाई केली

कोल्हापूर -  उजळाईवाडी (ता. करवीर) येथील पानटपरी चालकाकडे खंडणी मागणाऱ्या तिघा संशयित फाळकूटदादांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. राजारामपुरीत सापळा रचून आजही कारवाई केली. अटक केलेल्या संशयितांची नावे ः अलंकार अभिजित मुळीक (वय १९, उजळाईवाडी), विशाल ऊर्फ गोट्यालातूर अविनाश माने (१९, राजारामपुरी १४ वी गल्ली) आणि विशाल प्रकाश वडर (२०, रा. राजारामपुरी १२ वी गल्ली) अशी आहेत.

किशोर राजाराम ढोकरे यांची शाहू टोल नाक्‍याजवळ पानटपरी आहे. ३ मार्चला दुपारी काही तरुण त्यांच्या पानटपरीत गेले. टपरी चालवायची असेल तर दर आठवड्याला हजार रुपयाची खंडणी द्या, नाहीतर टपरी बंद करायची, नाहीतर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. 

याबाबत ढोकरे यांनी तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडित, रमेश डोईफोडे, यशवत उपराटे आदींनी सापळा रचून अलंकार, विशाल ऊर्फ गोट्यालातूर आणि वडर या तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना गोकुळ शिगाव पोलिसांनी अटक केली.

Web Title: Kolhapur News three arrested in Tribute case