कसबा बावडा रस्त्यावर पाच सात मिनिटांचा थरार...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

अचानक रिक्षातून धूर येऊ लागला. चालकाने प्रसंगावधान राखत रिक्षा सैनिकी मुलांच्या सिंहगड या वसतिगृहासमोरील रस्त्यावर बाजूला थांबवली, परंतु प्रचंड धुरामुळे रिक्षात काय बिघाड झाले ते समजत नव्हते.

कोल्हापूर : कसबा बावडयातील एका गॅस एजन्सीच्या वाहतूक करणाऱ्या चालत्या रिक्षातून अचानक मोठा धूर येऊ लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखून रिक्षा रस्त्याच्या बाजूला थांबवली आणि त्यामधील भरलेली काही सिलेंडर बाजूच्या रिकाम्या जागेत टाकली. परंतु तोपर्यत रिक्षातून येणारा धूर कमी झाल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान कसबा बावड्यातील एका गॅस एजन्सीची रिक्षा व्यापारी वापराचे पंधरा वीस सिलेंडर घेऊन जात असताना कसबा बावडा रोडवरील मेरी वेदर क्रीडांगणाच्या समोर अचानक रिक्षातून धूर येऊ लागला. चालकाने प्रसंगावधान राखत रिक्षा सैनिकी मुलांच्या सिंहगड या वसतिगृहासमोरील रस्त्यावर बाजूला थांबवली, परंतु प्रचंड धुरामुळे रिक्षात काय बिघाड झाले ते समजत नव्हते.

रिक्षा चालक  प्रचंड घाबरलेला होता. प्रचंड धुरामुळे किती वेळात काय होईल याचा अंदाज येत नव्हता कधी भडका उडेल याचा नेम नव्हता. येणारे जाणारे रिक्षा जवळ जाण्यास घाबरून लांबूनच पाहत होते. पण एक पत्रकार आणि एक रिक्षाचालक त्यांच्याजवळ गेले.त्यांनी रिक्षात मागील बाजूस असणारे भरलेले सिलेंडर बाहेर काढून बाजूच्या  रिकाम्या जागेत टाकण्यास सांगितले.सहा सात भरलेले सिलेंडर रिक्षातून काढून बाजूला टाकले. तो पर्यत रिक्षातून येणारा धूर कमी होत गेला आणि उपस्थित असणाऱ्यांनी निश्वास सोडला.दुपारची एक वाजण्याची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती.परंतु अचानक पाच दहा मिनिटा करीता उद्भवलेल्या मोठ्या प्रसंगाने उपस्थितांचे उच्चदाब वाढून श्वास रोखले होते.त्यानंतर संबंधित मालकांना याची कल्पना देऊन दुसरी वाहतूक करणारी रिक्षा मागवण्यात आली.
 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या

उद्योगजकतेच्या दिशेने तरूणाईने टाकले एक पाऊल पुढे
मुंबई सांताक्रूझ परिसरात 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या
उद्या लागणार बारावीचा निकाल
गाण्यांत वापरली इंग्रजी, हिंदी भाषा तर बिघडले काय? : महेश मांजरेकर
गड्यांनो, आपले गाव विकासापासून कोसो मैल दूर
नोटाबंदीने जिल्हा बँका अडचणीत : शरद पवार
इंदापुरात राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प
... आता पुढचं आयुष्य फक्त देशासाठीच!
दहशतवादी पाकबरोबर क्रिकेट नाहीच: क्रीडामंत्री

Web Title: kolhapur news thrilling presence of mind rickshaw accident