अपर पोलिस अधीक्षकपदी तिरुपती काकडेंची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

कोल्हापूर - महिनाभर रिक्त असलेल्या कोल्हापूरच्या अपर पोलिस अधीक्षकपदी तिरुपती काकडे यांची नियुक्ती झाली; तर गडहिंग्लज अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांना गुन्हे अन्वेषण विभागात अधीक्षकपदी बढती मिळाली. गृहविभागाकडून बदलीचे आदेश आज मिळाले आहेत.

अपर पोलिस अधीक्षकपदावर काम करणाऱ्या सुहेल शर्मा यांना सांगलीच्या पोलिस अधीक्षकपदी बढती मिळाली. महिनाभरापासून हे पद रिक्त होते. अपर पोलिस अधीक्षकांकडे सध्या ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास आहे. तोही रिक्तपदामुळे थंडावला होता. गृहविभागाने आज बदलीचे आदेश काढले. त्यानुसार महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिकचे अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांची कोल्हापुरातील शर्मा यांच्या रिक्त झालेल्या जागेवर बदली केली. ते लवकरच कार्यभार हाती घेणार आहेत. गडहिंग्लजचे अपर पोलिस अधीक्षक डॉ. बारी यांचीही बदली गुन्हे अन्वेषण विभागाकडे झाली.

सीआयडी सध्या वारणानगरातील पोलिसांनी मारलेला कोट्यवधींच्या डल्ल्याचा तपास करत आहेत. त्याचा तपास आता बारी करतील. त्याचबरोबर नाशिक येथील प्राचार्य डी.टी.एस.चे श्रीनिवास घाडगे यांची डॉ. बारी यांच्या जागी गडहिंग्लज अपर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती केली.

Web Title: Kolhapur News Tirupati Kakade as Additional Superintendent of Police