शौचालय देण्यासाठी जि.प. घेणार पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

कोल्हापूर - स्वच्छ भारत अभियानात कोल्हापूर जिल्हा परिषदेने देशात पाचवा क्रमांक पटकाविला. हाच आदर्श कायम राखण्यासाठी जि. प.च्या शाळांत शिकणाऱ्या ५,८८७ विद्यार्थ्यांच्या घरी शौचालय नाही, ही धक्कादायक बाब आहे. त्यामुळे, ‘माझ्या घरी शौचालय नाही’ म्हणून मत नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांची ज्या-त्या शाळेतून माहिती घेऊन त्यांना शौचालय कसे मिळेल, यासाठी जिल्हा परिषद पुढाकार घेईल.

गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्‍टोबर २०१७ ला जिल्हा परिषदेच्या शाळांत मतदानाद्वारे स्वच्छतेची माहिती घेतली. या माहितीच्या आधारेच आज ‘सकाळ’ने ही धक्कादायक माहिती सर्वांसमोर आणली. त्यानंतर शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी या विद्यार्थ्यांना शौचालय देण्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत.

शिक्षण समिती सभापती श्री. घाटगे म्हणाले, ‘‘५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या घरी शौचालय नसेल तर ही बाब गंभीर आहे. संबंधित विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांना शौचालय देण्यासाठी प्राधान्य देण्याबाबत विचार केला जाईल.’’ डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या घरी शौचालय नसेल तर त्यांना शौचालय देण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे.

मतदानाद्वारे मुलांनी दिलेल्या माहितीचा विचार केला जाईल. मतदान पत्रिकेत असणाऱ्या प्रत्येक प्रश्‍नाच्या उत्तराचा गांभीर्याने विचार केला जाईल.’’

Web Title: kolhapur news toilet zp