राधानगरीत 19, 20 मे रोजी पर्यटन महोत्सवाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

राधानगरी - राधानगरी पर्यटन महोत्सव १९ व २० मे रोजी होणार असून पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांसाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.  जि. प. चे माजी सदस्य अभिजित तायशेटे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत राधानगरीत बैठकीत झाली.  

राधानगरी - राधानगरी पर्यटन महोत्सव १९ व २० मे रोजी होणार असून पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांसाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.  जि. प. चे माजी सदस्य अभिजित तायशेटे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत राधानगरीत बैठकीत झाली.  

सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य महोत्सव, काजवा महोत्सव, गाईड प्रशिक्षण, राज्यभरातील पर्यटकांना राधानगरी-दाजीपूर परिसर दर्शन, जंगल सफारी, साहसी खेळ, निसर्ग छायाचित्रे प्रदर्शन व राधानगरी पर्यटन डॉक्‍युमेंटरी प्रकाशन अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून
या महोत्सवासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळणार आहे.

या महोत्सवामुळे राज्यभरातील पर्यटकांना राधानगरीचे दर्शन होणार आहे. यासाठी ग्रामपंचायत, व्यापारी संघटना, हॉटेल मालक संघ, बायसन नेचर क्‍लब, सर्व तरुण मंडळे, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ यांचे सहकार्य आहे. 

बैठकीला सरपंच कविता शेट्टी, उपसरपंच सचिन पालकर, सर्व सदस्य, तंटामुक्तचे अध्यक्ष अरविंद हुपरीकर, संभाजी आरडे, सुहास निंबालकर, सुभाष इंगवले, उत्तम पाटील, मंगेश चौगले, सुनील बडदारे, नेचर क्‍लबचे सम्राट केरकर, तसेच सामाजिक, राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Tourism Festival on 19, 20 May in Radhanagari