वाहतुक पोलिसांचा मोर्चा शाळा, शिकवणीकडे

राजेश मोरे
शुक्रवार, 16 मार्च 2018

कोल्हापूर - शहरातील मुख्य चौकातच नव्हे तर थेट शहर व उपनगरातील शाळा आणि खासगी शिकवण्याजवळ जाऊन मोटारसायकल चालविणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांवर तसेच विना-लायसन्स गाडी चालविणे कारवाईसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. यातून गैरप्रकाराला आळा बसवण्याबरोबर वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न होत आहे. 

शहर परिसरात आज सर्रास शाळकरी मुलांच्या हातात मोटारसायकल दिसतात. मुलाला शाळेत सोडण्यासाठी येणारे काही पालकही मागे बसून मुलांच्या हातात मोटारसायकल देऊन त्यांचे अनावश्‍यक धाडस वाढवू लागले आहेत. ‘मुलगा सातवी-आठवीत आहे. मात्र बिनधास्त गाडी चालवतो’, असे कौतुक करण्यात काही पालक इतरांपेक्षा पुढेच असतात. आपल्याला काही सुख मिळाले नाही, कोणतीही हौस पूर्ण झालेली नाही. मुलांची हौस पूर्ण करण्याचा आज प्रत्येक पालकांचा प्रयत्न सुरू आहे. त्यात मुलांच्या हट्टी स्वभावाची भर पडू लागली. मुले शिक्षकांचा डोळा चुकवून शाळा, शिकवणीपासून काही अंतरावर पार्किंग करतात. शाळा शिकवणी सुटल्यानंतर ते वाहतुकीचे नियम न जुमानता रस्त्यावरून सुसाट जातात.

अल्पवयीन मोटारसायकल स्वारांमुळे अपघात आणि वाहतूक कोंडीचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे. त्यावर पोलिस प्रशासनाने  दोन दिवसापासून कारवाईचा बडगा उगारला. शहरातील चौका-चौकात ट्रॅफिक ड्राईव्ह घेऊन अल्पववीन मोटारसायलस्वारांवर कारवाई सुरू केली. त्यांच्या पालकांवर आणि वाहन चालकांवर गुन्हे नोंद करण्याची प्रक्रियाही सुरू केली. कालच न्यायालयाने पाच पालकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली. आज तब्बल २१ पालकांवर कारवाई केली. याउलट शहरात कारवाई सुरू असताना उपनगरात मोटारसायकल चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांवर काहीही फरक 
पडलेला नव्हता. 

Web Title: Kolhapur News traffic police action on students