वाहतूक नियम मोडण्याची कारणे १०...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

वाहतुकीचे नियम पाळा, असे कितीही सांगितले, तरी अनेक जण वाहतूक नियम धाब्यावर बसवतात. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांतर्फे कारवाई होते. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न असतो; परंतु नियम मोडायचे आणि त्यासाठी वेगवेगळी कारणे सांगायची असा एक प्रघातच पडला आहे. यात नातेवाइकांचे निधन, आई रुग्णालयात आहे, यापासून...हा फोन घ्या...बोला अशापर्यंत विविध कारणे असतात. ‘सकाळ’च्या बातमीदारांनी शहरातील माळकरी तिकटी, शिवाजी पूल, कावळा नाका व दाभोळकर कॉर्नर या चार ठिकाणी स्पॉटवर जाऊन पडताळणी केली. यातून नियम मोडणाऱ्यांकडे नियम मोडल्याची कारणे आहेत; परंतु नियम मोडला मान्य आहे, दंड भरतो आणि परत असे होणार नाही, असे म्हणण्याचे धाडस नाही, हे वास्तव पुढे आले.

माळकर तिकटी....वेळ ः सायं. ४.३० ते ५.३०

 •  एकदा माफ करा, मंदिरात असतो. कधीही या तिकडे...  
 •  दुसरा शर्ट घालून आलो, त्यात लायसन्स विसरले...
 •  घरी लायसन्स आहे, पण घर लांब आहे...
 •  पोलिस आहे...अगं चल, फास्ट...थांबू नको, म्हणत तिने
 •    गाडी नेली सुसाट 
 •  सिग्नल तोडून जाताना तरुणीकडून ओढणीने गाडीची नंबरप्लेट झाकण्याचा प्रयत्न
 •  मुलाला शिकवणीतून आणण्यासाठी बाहेर पडले होते,
 • लायसन्स घरात राहिले.
 •  फाटलेले लायसन्स दाखवतात...
 •  मोबाईल काढला, वशिल्यासाठी कॉल केला आणि साहेब
 •    बोला फोनवर (मग्रुरीच्या भाषेत)

शिवाजी पूल.....वेळ ः सायं. ५.४५ ते ६.३०  

 •   चूक झाली... लायसन्स नाही...एकदा माफ करा
 •   मंदी आहे, दोनशे रुपये दंड परवडत नाही
 •   खूप दिवसांपासून बेपत्ता असलेली बहीण सापडली...
 • त्या टेन्शनमध्ये आहे... सोडा
 •   कॉलेजमध्ये नोकरीला आहे... गडबडीत नवीन शर्ट घातला... लायसन्स जुन्या शर्टमध्ये राहिले
 •   लायसन्स शोधण्यासाठी पाकीट काढून उगीचच चिठ्ठ्या काढून दाखविण्याचा प्रयत्न 
 •   धूम स्टाईलने पोलिसांना चकवा देऊन सटकले
 •   पोलिसांना पाहून दुचाकीवरून तिब्बल सीटपैकी एकाने लांबूनच उडी मारली.

कावळा नाका.....वेळ ः सायं. ५ ते ५.३०

 •   आई ॲडमिट आहे, लायसन्स घरी विसरले 
 •   (तिब्बल सिट मुलींना घेऊन चाललेला गृहस्थ) मुलींना 
 •  क्‍लासला सोडायला चाललोय, लायसन्स विसरले. 
 •    फॅन्सी नंबर प्लेट चुकून केली, बदलतो.
 •    हौस म्हणून फॅन्सी नंबर प्लेट केली... बदलतो, लायसन्स
 •   ठेवून घ्या.
 •    सीपीआरमध्ये पेशंट बघायला चाललोय. 

व्हिनस कॉर्नर व फोर्ड कॉर्नर....वेळ ः सायं. ५ ते ६.१५

 •   लायसन्सची झेरॉक्‍स आहे. 
 •   जिमला गेलेलो, पण पाकीट घरात आहे. 
 •   पावती करायचा अधिकार नाही, आम्ही नियम मोडीन...पोलिसांशी उद्धट वर्तन.  
 •   लायसन्स कच्चे आहे, पावती करेपर्यंत आधार कार्ड ठेवा.

पोलिसांची भूमिका

 •   विविध कारणे सांगितली, की वाहतूक पोलिसही दंडात्मक कारवाई करतात. 
 •   नातेवाईक आजारी आहेत, कोणाचे तरी निधन झाले, अशांची खात्री करून घेतात. 
 •   उद्धट वर्तन करणाऱ्याला थेट कार्यालयात जाऊन पावती करण्यास सांगतात.
 •   मोबाईल लावून बोला म्हणणाऱ्याचे म्हणणे ऐकून घेतात, पण कारवाई करतात.
 •   कोण खरे, कोण खोट बोलतो, हे लक्षात येताच त्यानुसार कारवाई.

(संकल्पना ः निखिल पंडितराव, संकलन ः लुमाकांत नलवडे, 
राजेश मोरे, छायाचित्रकार ः बी. डी. चेचर, नितीन जाधव)

Web Title: Kolhapur News Traffic Rules Special Story