सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

कोल्हापूर - कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या जिल्ह्यांतील ३० पोलिस निरीक्षक, ७३ सहायक निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. यात जिल्ह्यातील सहा पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.

कोल्हापूर - कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या जिल्ह्यांतील ३० पोलिस निरीक्षक, ७३ सहायक निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. यात जिल्ह्यातील सहा पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात परिक्षेत्रातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या मुलाखती झाल्या. याची अंतिम यादी  (ता. ६) जाहीर होणार आहे. 

एकाच जिल्ह्यात चार वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात जिल्ह्यातून अशोक धुमाळ (वाहतूक शाखा), निशिकांत भुजबळ (विमानतळ), अनिल गाडे (शाहूवाडी), धनंजय जाधव (पोलिस कल्याण), शौकत जमादार (पासपोर्ट विभाग), अरविंद चौधरी (भुदरगड), सहायक पोलिस निरीक्षकांमध्ये विद्या जाधव (पोलिस मुख्यालय), पुष्पलता मंडले (करवीर), विकास जाधव (कोडोली), विठ्ठल दराडे (जुना राजवाडा), राकेश हांडे (मुरगूड) आदींचा समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या कोणत्या ठिकाणी बदल्या झाल्या, त्याची यादी रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही. बदली समितीत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, साताऱ्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, करवीरचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव आदींचा समावेश आहे.

इच्छुक ठिकाणी बदली व्हावी, यासाठी अनेकांनी आपल्या लोकप्रतिनिधीपासून मंत्र्यांपर्यंत फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे. यामुळे अधिकाऱ्यांसह कुटुंबीयांना बदलीबाबत उत्सुकता आहे.

Web Title: Kolhapur News Transfer of Six police Inspectors