त्र्यंबोली देवीच्या दर्शनासाठी गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

कोल्हापूर - सिस्टीम, पीऽऽ ढबाक, ढोल-ताशांच्या तालावर आज नव्या पाण्याच्या यात्रेची सांगता आज झाली. सकाळपासून सायंकाळी सातपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागातून वाजत-गाजत पाणी त्र्यंबोली देवीच्या मंदिराकडे येत होते. पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर असल्यामुळे अनेकांनी कै. संजय गायकवाड यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या पाण्याचे पूजन केले. 

पावसाच्या पाण्यामुळे कोणतीही हानी होऊ नये, रोगराई पसरू नये, यासाठी पंचगंगा नदीचे नवे पाणी त्र्यंबोली देवीला वाजता-गाजत नेण्याची प्रथा कोल्हापुरात आहे. मंगळवार आणि शुक्रवार अशा दोनच दिवशी पाण्याचे पूजन केले जाते. पाणी घागरीत घेऊन तिला फुलांच्या माळा, गजऱ्यांनी सजविले जाते. आषाढातील शेवटचा शुक्रवार अर्थात पाणी वाहण्याचा शेवटचा दिवस मानला जातो. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत पाणी वाहण्याचे कार्यक्रम सुरूच होता. गुलालाच्या उधळणीत डॉल्बी सिस्टीमसह पीऽऽ ढबाक, ढोल-ताशांच्या कडकडाटात महिला, तरुण-तरुणींचाही यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभाग होता. कपाळाला भंडारा लावून, गुलालाची उधळण करीत पाणी त्र्यंबोली टेकडीकडे रवाना होत असल्याचे चित्र शहरात होते. यात्रेच्या शेवटच्या दिवशी सिस्टीमचा मोठ्या प्रमाणात वापर होईल, अशी शक्‍यता होती. मात्र काही अपवाद सोडले तर पीऽऽ ढबाक आणि हलगी-बाजाचाच वापर मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्याच बरोबरीने ढोल-ताशांचा कडकडाटही होता. 

त्र्यंबोली देवीच्या मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पावसाच्या रिमझिम सरीमध्येही भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले. टेंबलाई टेकडीवर झोपाळे, फिरते पाळणे, खेळण्यांची दुकाने थाटल्यामुळे अनेकांनी शासकीय कार्यालये सुटल्यावर सायंकाळनंतर गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला होता. 

Web Title: kolhapur news Trimboli Devi