...तर तृप्ती देसाईंना कोल्हापुरात प्रवेश बंदी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

कोल्हापूर - महापौरांना काळे फासण्याच्या इशारा देणाऱ्या तृप्ती देसाई यांना जशास तसे उत्तर देण्याचा तसेच देसाई यांना कोल्हापुरात प्रवेश बंदी करण्याचा निर्धार आज महापालिका कर्मचारी तसेच सर्वपक्षीय कृत्ती समितीने केला. महापालिकेच्या मुख्य इमारतीच्याबाहेर देसाई यांच्या विरोधात जोरदार निदर्शने झाली. 

दारू दुकाने सुरू होण्यासाठी रस्ते हस्तांतर ठराव झाल्यास महापौर हसीना फरास यांना काळे फासू असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा देसाई यांनी दोन दिवसापूर्वी दिला होता. सकाळी अकराच्या सुमारास काम बंदची हाक देऊन कर्मचारी एकत्रित आले. यात महिलांची संख्या मोठी होती. "तृप्ती देसाई यांचा धिक्कार असो, तृप्ती देसाई कोण रे, पायताण मारा दोन रे' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारीही यात सहभागी झाले. 

ऍड. महादेवराव आडगुळे म्हणाले, ""महापौरांना काळे फासण्याचा इशारा हा कोल्हापुरचा अवमान आहे. देसाई यांनी ठरावाच्या विरोधात कायदेशीर लढाई जरूर लढावी; मात्र महापौरांचा अवमान करण्याचा प्रयत्न करू नये.'' राजू लाटकर यांनी देसाई यांची ही स्टंटबाजी असल्याचे सांगितले. आर. के. पोवार यांनी तृप्ती देसाई यांना आमच्या महिला भगिनी प्रतीकात्मक निषेध म्हणून कांद्याचा हार घालण्यास सज्ज असल्याचे सांगितले. शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे फिरोज खान यांनी देसाई यांना कायमस्वरूपी कोल्हापुरात प्रवेश बंदी करूया असे मत मांडले. देसाई यांनी पूर्वी कोल्हापुरचा हिसका अनुभवला आहे. देसाई पुन्हा कोल्हापुरात आल्यास त्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा देण्यात आला. दोन्ही कॉंग्रेसचे नगरसेवक, नगरसेविका, बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, अशोक भंडारे, किशोर घाटगे, सुरेश जरग, महापालिका कर्मचारी संघाचे बाबूराव ओतारी, विजय वणकुद्रे आदी उपस्थित होते.

Web Title: kolhapur news Trupti Desai

टॅग्स