फुटबॉल स्पर्धेचे दोन वेळा उद्घाटन

संदीप खांडेकर
गुरुवार, 19 जुलै 2018

कोल्हापूर - महापालिकास्तरीय चौदा वर्षाखालील सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे दोन वेळा उद्घाटन कसे होऊ शकते, याची प्रचिती आज येथे आली.

सकाळच्या सत्रात नगरसेवक किरण नकाते, संतोष गायकवाड, विजय खाडे-पाटील,  जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले असताना प्राथमिक शिक्षण समितीचे सभापती अशोक जाधव यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मैदानावरील फुटबॉल संघांना उद्घाटनासाठी बोलविण्यात आले होते. एकदा उद् घाटन झाले असताना पुन्हा कसे, असा प्रश्न खेळाडूंच्या चेहऱ्यावर दिसत होता. या प्रकाराची मैदानावर चर्चा सुरू होती.

Web Title: Kolhapur News Two times the opening of the football tournament