मुरगूडला भुमीगत वीजवाहीनीचे काम रखडले

प्रकाश तिराळे
रविवार, 10 जून 2018

मुरगूड - शहरातून सुमारे 5 कि. मी.लांबीच्या भुमीगत वीजवाहीनीचे काम शासनाकडून सुरु आहे. पण विविध कारणामूळे या कामाला ब्रेक लागल्याने सध्या हे काम रखडले आहे. परिणामी चर काढल्याने बसस्थानक परिसरात मोठ्याप्रमाणावर दररोज वाहतूकीची कोंडी होत आहे.

मुरगूड - शहरातून सुमारे 5 कि. मी.लांबीच्या भुमीगत वीजवाहीनीचे काम शासनाकडून सुरु आहे. पण विविध कारणामूळे या कामाला ब्रेक लागल्याने सध्या हे काम रखडले आहे. परिणामी चर काढल्याने बसस्थानक परिसरात मोठ्याप्रमाणावर दररोज वाहतूकीची कोंडी होत आहे.

या कामासाठी केंद्र शासनाकडून 2 कोटी 64 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी 44 लाख रुपयांचे सध्या काम सुरू आहे. गेले महिनाभर हे सुरु आहे. मुख्य बाजार पेठेतील काम अंतिम टप्यात आले आले आहे. पण कांही ठिकाणी वीज वाहिन्या जोडणीचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्याचा त्रास व्यापाऱ्यांना होत आहे. ग्राहकांना दुकानामध्ये ये - जा करताना अडथळे निर्माण होत आहेत.

शहराची वाढणारी लोकसंख्या दिवसेंदिवस वाढणारी रहदारी याचा विचार करून शहरात अडथळा ठरणारे विजेचे खांब आणि वीज वाहिन्यांचे जनजाळ कमी करण्यासाठी वीज वितरण कंपनीने पाऊल उचलले. त्यानुसार राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला. त्यातील 44 लाख रुपयांचे भूमीगत वीज वाहिनी घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम इंडिया केबल्स या कंपनीने घेतले आहे. शहरातून मोठी चर खुदाई करून त्यामध्ये वाहिन्या घालण्यात येत आहेत. पण काही ठिकाणी हे काम अर्धवट वस्थेत आहे. राजीव गांधी चौकात गेल्या काही दिवसापासून वाहिन्या जोडणीचे काम रखडलेले आहे. या ठिकाणी चार रस्ते येऊन मिळत असल्याने येथे वाहतूकीची कोंडी होत आहे.

मग चर खुदाई का केली...?
बसस्थानकासमोरील रस्त्यावर वीज वाहिण्यासाठी खुदाई करण्यात आली आहे. हे काम गेल्या आठ दहा दिवसापासून रखडले आहे. आम्हाला दुकानात जाता येत नाही. ग्राहकांना त्रास होत आहे. काम लवकर होणार नव्हते. तर मग चर खुदाई कशासाठी करण्यात आली? या ठिकाणी वाहतूकीची कोंडी होत आहे. याला जबाबदार कोण ? संबंधितांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे.  

- दिलीप सुतार, मुरगूड.

Web Title: Kolhapur News underground electricity work pending in Murgud