नागरी स्वच्छता अभियानांतर्गत प्रभागांना बक्षीस वितरण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - महापालिकेच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान 2016-17 अंतर्गत स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील बक्षीस पात्र वॉर्डना प्रमाणपत्रे वितरण महापौर हसीना फरास यांच्या हस्ते झाले. मंगळवारी (ता. 15) महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात हा कार्यक्रम झाला. 

कोल्हापूर - महापालिकेच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान 2016-17 अंतर्गत स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील बक्षीस पात्र वॉर्डना प्रमाणपत्रे वितरण महापौर हसीना फरास यांच्या हस्ते झाले. मंगळवारी (ता. 15) महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात हा कार्यक्रम झाला. 

या फेरीमध्ये गांधी मैदान विभागीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र.80 कणेरकरनगर क्रांतिसिंह नाना पाटीलनगर (प्राथमिक शिक्षण समिती सभापती वनिता देठे) प्रभागास प्रथम क्रमांक, तर प्रभाग क्र. 60 जवाहरनगर (नगरसेवक भूपाल शेटे) प्रभागास द्वितीय क्रमांक मिळाला. शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. 32 बिंदू चौक (नगरसेवक ईश्‍वर परमार) प्रथम, तर प्रभाग क्र.45 कैलासगडची स्वारी मंदिर (नगरसेवक संभाजी जाधव) द्वितीय, विभागीय कार्यालय क्र.3 (राजारामपुरी) अंतर्गत प्रभाग क्र. 38 टाकाळा खण माळी कॉलनी (नगरसेविका सविता भालकर) प्रथम तर प्रभाग क्र.36 राजारामपुरी (नगरसेवक संदीप कवाळे) द्वितीय, विभागीय कार्यालय क्र. 4 ताराराणी मार्केटअंतर्गत प्रभाग क्र.3 कसबा बावडा हनुमाननगर (स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार) प्रथम, तर प्रभाग क्र. 7 सर्किट हाऊस (नगरसेविका अर्चना पागर) द्वितीय क्रमांक मिळाला. प्रथम क्रमांकास रुपये 10 हजार व प्रमाणपत्र, तर द्वितीय क्रमांकास रुपये 5 हजार व प्रमाणपत्र असे बक्षीस आहे. सहायक आयुक्त संजय भोसले यांनी सूत्रसंचालन केले. 

आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार, प्राथमिक शिक्षण समिती सभापती वनिता देठे, सभागृह नेता प्रवीण केसरकर, विरोधी पक्षनेता किरण शिराळे, प्रभाग समिती सभापती सुरेखा शहा, गटनेता सुनील पाटील, सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, नगरसेवक आशिष ढवळे, राजाराम गायकवाड, ईश्‍वर परमार, महेश सावंत, अशोक जाधव, तौफिक मुल्लाणी, अजिंक्‍य चव्हाण, अजित ठाणेकर, संभाजी जाधव, महेश सावंत, संजय मोहिते, नगरसेविका जयश्री जाधव, रिना कांबळे, सविता भालकर, मेहजबीन सुभेदार, सुनंदा मोहिते, रूपाराणी निकम, अर्चना पागर, ललिता बारामते, सरिता मोरे, प्र. उपायुक्त मंगेश शिंदे, प्र. सहायक आयुक्त संजय सरनाईक, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंदळे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ. अरुण वाडेकर, उपशहर अभियंता एस. के. माने, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली जाधव, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

Web Title: kolhapur news Urban Sanitation Campaign