ऊर्जा-संवाद ध्येयवेड्यांशी आजपासून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

कोल्हापूर - ज्ञानाची कक्षा रुंदावून नवविचारांची ऊर्जा चेतवणारा सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिझिंगा - संजय घोडावत ग्रुप प्रस्तुत ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ या कार्यक्रमाची सुरुवात आजपासून (ता. ३) होत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात या मुक्‍त संवाद मालिकेला प्रारंभ होईल. आज (ता. ३) पहिल्या दिवशी प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे यांच्याशी संवाद साधला जाईल.

कोल्हापूर - ज्ञानाची कक्षा रुंदावून नवविचारांची ऊर्जा चेतवणारा सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिझिंगा - संजय घोडावत ग्रुप प्रस्तुत ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ या कार्यक्रमाची सुरुवात आजपासून (ता. ३) होत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात या मुक्‍त संवाद मालिकेला प्रारंभ होईल. आज (ता. ३) पहिल्या दिवशी प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे यांच्याशी संवाद साधला जाईल.

‘ऊर्जा’ उपक्रमाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. तीन वर्षांत विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटीज्‌शी दिलखुलास संवाद साधण्याची संधी मिळाली. साहजिकच या तिन्ही उपक्रमांना कोल्हापूरकरांनी मोठी उपस्थिती लावली आणि नवविचारांची ऊर्जा बरोबर घेतली. ‘ऊर्जा संवाद ध्येयवेड्यांशी’ कार्यक्रमाची कोल्हापूरकर आतुरतेने वाट पाहत असतात, असाच हा सोहळा असतो. यंदाही विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या अशाच नामांकित वक्‍त्यांची प्रभावळ 
या उपक्रमाला लाभली आहे. उद्यापासून (ता. ३) सुरू होणाऱ्या कार्यक्रमासाठी आजच वेळेचे नियोजन करा. ६ मार्चपर्यंत हा संवाद साधला जाईल.

असे होतील संवाद

  • रविवार (ता. ४) - भारतीय अंध क्रिकेट संघाचे माजी कर्णधार पद्मश्री शेखर नाईक, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा मिश्रा.  

  • सोमवार (ता. ५) -  सॉफ्टवेअर क्षेत्रातील प्रसिद्ध तंत्रज्ञ राकेश देशमुख, प्रसिद्ध जाहिरातकार राज कांबळे.

  • मंगळवार (ता. ६) - साताऱ्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पायलट व विमाननिर्मितीतील मराठी उद्योजक कॅप्टन अमोल यादव 

शिवाजी विद्यापीठाचे यंदाही विशेष सहकार्य 
‘ऊर्जा ः संवाद ध्येयवेड्यांशी’ या उपक्रमाला गेली चार वर्षे शिवाजी विद्यापीठाचे विशेष सहकार्य मिळाले आहे. 
विद्यापीठाच्या लोककला केंद्रात रोज सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत मुलाखती रंगतील. गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर पार्किंगची नेटकी व्यवस्था असेल. 

मोफत सन्मानिका
कार्यक्रमाला सर्वांसाठी विनामूल्य खुला प्रवेश असून मोफत सन्मानिका ‘सकाळ’च्या शिवाजी उद्यमनगरातील कार्यालयात उपलब्ध आहेत. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सन्मानिकांचे वितरण सुरू आहे. रेडिओ सिटी (धैर्यप्रसाद हॉलजवळ, ताराबाई पार्क), श्री ट्रॅव्हल्स (शाहूपुरी, कोल्हापूर) येथेही सन्मानिका उपलब्ध आहेत. 

प्रायोजकांविषयी... 

  • सहप्रायोजक ः चाटे शिक्षण समूह, मार्व्हलस्‌ इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड, तनिष्क ज्वेलर्स, 
  • अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, श्री ट्रॅव्हल्स 
  • हॉस्पिटॅलिटी पार्टनर ः हॉटेल सयाजी 
  • रेडिओ पार्टनर ः रेडिओ सिटी
Web Title: Kolhapur News Urja Sanwad Dheyavedyashi