‘सकाळ’तर्फे रंगणार ‘ऊर्जा-संवाद ध्येयवेड्यांशी’

‘सकाळ’तर्फे रंगणार ‘ऊर्जा-संवाद ध्येयवेड्यांशी’

कोल्हापूर - सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठाच्यावतीने तीन मार्चपासून सलग चार दिवस फिझिंगा - संजय घोडावत ग्रुप प्रस्तुत ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ हा अनोखा कार्यक्रम रंगणार आहे.

लोककला केंद्रात दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत यशोलौकिकाच्या शिलेदारांशी संवाद साधण्याची ही पर्वणी ठरणार आहे. दरम्यान, आपल्या आजवरच्या वाटचालीतील विविध अनुभवांची शिदोरी ही मंडळी या निमित्ताने सर्वांसमोर रिती करतीलच; त्याशिवाय प्रत्येकातील नवचेतना जागवताना आपापल्या क्षेत्रात नेटाने पुढे जाण्यासाठीची ऊर्जाही देतील. कार्यक्रमाला सर्वांसाठी विनामूल्य खुला प्रवेश असून सोमवार (ता. २६) पासून मोफत सन्मानिका ‘सकाळ’च्या शिवाजी उद्यमनगरातील कार्यालयात उपलब्ध होणार आहेत.

असे होतील संवाद

  •  ३ मार्च - प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे
  •  ४ मार्च - पद्मश्री शेखर नाईक (भारतीय अंध क्रिकेट संघाचे माजी कर्णधार), नीलिमा मिश्रा (रॅमन मॅगेसेसे पुरस्कार विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या)
  •  ५ मार्च - राकेश देशमुख (सॉफ्टवेअर क्षेत्रातील प्रसिद्ध तंत्रज्ञ), राज कांबळे (प्रसिद्ध जाहिरातकार).
  •  ६ मार्च - संदीप पाटील (आयपीएस, सातारा), कॅप्टन अमोल यादव (पायलट व विमाननिर्मितीतील मराठी उद्योजक)

‘सकाळ’ने तीन वर्षांपूर्वी या अनोख्या उपक्रमाला प्रारंभ केला. बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथाकार सुभाष घई, प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी, प्रसिद्ध अभिनेता राहुल बोस, सयाजी शिंदे, भारत विकास ग्रुप - बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे हणमंतराव गायकवाड, ‘सुपर थर्टी’चे संस्थापक आणि गणितज्ज्ञ आनंद कुमार, ज्ञानेश्‍वर मुळे, प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर, भारतातील पहिली वाईन उद्योजिका अचला जोशी, प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र पटेल, ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, कुशल संघटक प्रदीप लोखंडे, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, ग्लोबल वेलनेस ॲम्बॅसिडर रेखा चौधरी, दिग्दर्शक अभिनय देव, फ्लेम युनिव्हर्सिटीचे संस्थापक संचालक पराग शहा, ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर, दास ऑफशोअरचे अशोक खाडे, विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांच्याशी दिलखुलास संवाद साधण्याची संधी मिळाली होती. यंदाही अशाच नामांकित वक्‍त्यांची प्रभावळ लाभली आहे. चला तर मग, आजच वेळेचे नियोजन करू या. तीन ते सहा मार्चची सायंकाळ नवप्रेरणादायी करू या...! अधिक माहितीसाठी सूरज जमादार (मोबाईल ९५५२५८१९१८) यांच्याशी संपर्क साधावा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com