वस्ताद नागराळेसह पाच जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

कोल्हापूर - शाहूपुरी व्यापारी पेठेतील जागेच्या वादातून दोशी बंधूंवर केलेल्या हल्लाप्रकरणी वस्ताद अशोक जाधव ऊर्फ नागराळे (वय ५५) याच्यासह पाच जणांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अद्याप एकाचा शोध सुरू आहे. 

कोल्हापूर - शाहूपुरी व्यापारी पेठेतील जागेच्या वादातून दोशी बंधूंवर केलेल्या हल्लाप्रकरणी वस्ताद अशोक जाधव ऊर्फ नागराळे (वय ५५) याच्यासह पाच जणांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अद्याप एकाचा शोध सुरू आहे. 

अटक केलेल्या संशयितांची नावे, वस्ताद अशोक पांडुरंग जाधव ऊर्फ नागराळे (वय ५५), पवन संभाजी शिंदे (वय २३), अमोल बाळू बागांव (वय २५), महेश ज्ञानदेव बागडे (वय २०) आणि विकास विलास माने (वय २४, सर्व रा. शाहूपुरी तालीम व्यापारी पेठ) अशी आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी व्यापारी पेठ येथे दोशी कुटुंबीयांनी १९९५ मध्ये जागा खरेदी केली होती. त्या जागेत शिक्षण संस्था होती. त्यांनी न्यायालयात मुदतवाढ मागितली. ती पूर्ण झाल्यानंतर दोशी कुटुंबीयांनी ती न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला. तो अंतिम टप्प्यात होता. काल सकाळी या जागेची पाहणी करण्यासाठी तुषार दोशी, पंकज दोशी, प्रशांत दोशी, अभय दोशी आणि प्रीतेश दोशी हे सर्वजण गेले होते.

त्या वेळी त्यांच्यावर वस्ताद अशोक जाधव ऊर्फ नागराळे, त्याचा मुलगा अमितसह पैलवानांनी हल्ला केला होता. हातोडी, कटावणीसह काठ्यांनी केलेल्या हल्ल्यात पाचही बंधू जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तुषार दोशींनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार अशोक नागराळेसह पवन, अमोल, महेश, विकास या पाच जणांना अटक केली. अमित जाधवचा पोलिस शोध घेत आहेत. अटक केलेल्या पाचही जणांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: Kolhapur News Vastad Nagarale arrested