आत्मदहनाचा इशारा देणारे भाजी विक्रेते ताब्यात

संभाजी थोरात
बुधवार, 14 मार्च 2018

कोल्हापूर - शहरातल्या रेल्वे फाटक परिसरात भाजी विक्रेते भाजी विकण्यासाठी बसतात. या विक्रेत्यांना गुंडांकडून त्रास होतो आहे. पाकिटमारांचाही या परिसरात सुळसुळाट आहे. या संदर्भात  प्रशानाकडून कोणतीच कारवाई होत नाही. यासाठी या परिसरातील भाजी विक्रेत्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

कोल्हापूर - शहरातल्या रेल्वे फाटक परिसरात भाजी विक्रेते भाजी विकण्यासाठी बसतात. या विक्रेत्यांना गुंडांकडून त्रास होतो आहे. पाकिटमारांचाही या परिसरात सुळसुळाट आहे. या संदर्भात प्रशानाकडून कोणतीच कारवाई होत नाही. या प्रश्नी या परिसरातील भाजी विक्रेत्यांनी आज आत्मदहनाचा प्रयत्न केला.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या भाजी विक्रेत्यांनी आज आंदोलन केले. तसेच त्यांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला. आत्मदहनाच्या तयारीत असणाऱ्या या आंदोलकांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने पुढचा अनर्थ टळला. या आंदोलनामध्ये महिलांची संख्या मोठी होती.

अनेक महिलांनी राॅकेलचे कॅन घेऊन आत्मदहन करण्याच्या तयारीत होत्या..पण पोलिसांनी ही कॅन हिसकावून घेतली..आणि सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्य़ात घेतले..पण आता या आंदोलनानंतर तरी पोलीस आणि जिल्हा प्रशासन त्यांच्या मागण्यांकडं लक्ष देणार का हे पहावं लागणार आहे. 

Web Title: Kolhapur News vegetable sellers agitation