राज्यात पहिले ‘ॲडव्हान्सड्‌ टेक्‍नॉलॉजी सेंटर’ शिवाजी विद्यापीठात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर -  शिवाजी विद्यापीठात राज्यातील पहिल्या ॲडव्हान्सड्‌ टेक्‍नॉलॉजी सेंटर - ए सेंटर फॉर ट्रेनिंग, रिसर्च अँड डेव्हलपमेंटची स्थापना केली आहे. या अनुषंगाने डिपार्टमेंट ऑफ टेक्‍नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद यांच्यात झालेल्या करारानुसार ही स्थापना झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर -  शिवाजी विद्यापीठात राज्यातील पहिल्या ॲडव्हान्सड्‌ टेक्‍नॉलॉजी सेंटर - ए सेंटर फॉर ट्रेनिंग, रिसर्च अँड डेव्हलपमेंटची स्थापना केली आहे. या अनुषंगाने डिपार्टमेंट ऑफ टेक्‍नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद यांच्यात झालेल्या करारानुसार ही स्थापना झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे, नागपूर व मुंबई येथे आय.जी.टी.आर.ची तीन उपकेंद्रे आहेत. मात्र, विद्यापीठातील हे केंद्र राज्यातील पहिले आहे. विद्यापीठाकडून सेंटरच्या माध्यमातून कौशल्याधारित प्रशिक्षण, समाजोपयोगी संशोधन व मनुष्यबळ विकास अशा प्रशिक्षण - संशोधन - विकास या तीन घटकांवर भरीव काम करणार असल्याचेही कुलगुरू शिंदे यांनी सांगितले.

स्थानिक उद्योगाच्या समस्या सोडविण्यास ‘ॲडव्हान्सड्‌ टेक्‍नॉलॉजी सेंटर’च्या माध्यमातून विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. उद्योगांच्या गरजांना समजून ‘नीड बेस्ड कोर्सेस’ दिले जातील. उद्योजक, प्राध्यापक, तरुणांना भारत सरकारच्या एम.एस.एम.ई. मंत्रालयांतर्गत इंडो जर्मन टूल रूम औरंगाबादच्या साहाय्याने अप्लाईड कोर्सेसच्या माध्यमातून कौशल्ये प्रदान केली जातील. सरकारच्या ‘स्टार्ट अप’ प्रकल्पांतर्गत आय.जी.टी.आर. औरंगाबाद येथेही प्रगत संशोधनाची सोय केली जाईल, असेही कुलगुरू शिंदे यांनी सांगितले.

दहावी-बारावी उत्तीर्ण, आय.टी.आय., डिप्लोमा, डिग्रीसह ७२ तासांपासून दीड वर्षाच्या अभ्यासक्रमापर्यंत शिक्षण दिले जाईल. एकूण ३६ अभ्यासक्रम येथे शिकवले जाणार आहेत. हॅन्डस्‌ ऑन ट्रेनिंग विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असल्याचे डिपार्टमेंट ऑफ टेक्‍नॉलॉजीचे चालक प्रा. डॉ. जयदीप बागी यांनी सांगितले.

प्र-कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव प्रा. डॉ. व्ही. डी. नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री. एम. ए. काकडे, वित्त व लेखा अधिकारी ए. बी. चौगुले, टेक्‍नॉलॉजी सेंटरचे समन्वयक श्री. हर्षवर्धन पंडित आदी परिषदेस उपस्थित होते.

काय आहे इंडो जर्मन टूल रूम?
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या वाढ व विकासाला चालना देण्यासाठी भारत सरकारने इंडो जर्मन टूल रूमची स्थापना केली. आय.जी.टी.आर. औरंगाबाद उद्योगांना जागतिक दर्जाचे उत्पादन व सेवा प्रदान करते. इंडो जर्मन टूल रूम, औरंगाबाद आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता साधने, प्रशिक्षित कर्मचारी, तसेच कन्सल्टन्सी देते.

डिपार्टमेंट टेक्‍नॉलॉजीचा गौरव...
टेक्‍निकल एज्युकेशन क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम (टीईक्‍यूआयपी)च्या दुसऱ्या टप्प्यात जागतिक बॅंकेचा साडेदहा कोटींचा निधी मिळाला होता. हिमाचल प्रदेशमधील राजीव गांधी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कांग्रा या संस्थेस सल्लागार संस्था म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमात उत्तर-पूर्व राज्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करणार असल्याचेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Vice Chancellor Dr. Shinde press