शाळा बंद प्रश्नांवर डाव्यांकडून खोटा प्रचार - विनोद तावडे

संदीप खांडेकर
रविवार, 13 मे 2018

कोल्हापूर - दहा पटसंख्येखालील शाळा बंद करत असताना डाव्या विचारसरणीचे लोक धादांत खोटा प्रचार करत आहेत. ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचीही त्यांनी दिशाभूल केली आहे. बहुजन समाजातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू नये, असा डाव्या विचारसरणीच्या लोकांचा खटाटोप सुरू आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडू, असा इशारा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. यावेळी त्यांनी डाव्या विचारसरणीच्या लोकांनी थेट बिंदू चौकात जाहीर चर्चेस यावे, असे आवाहन  केले.

श्री. तावडे म्हणाले, "दहा पटाखालील शाळा बंद करून त्या मुलांचे समायोजन अन्य शाळांत करायचे आहे. दहा पटाखालील शाळांत केवळ चार-पाच मुले असतात. त्या शाळा सुरू ठेवल्या तर तेथे स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा व सहलीचे आयोजन करता येत नाही.  मात्र, वस्तुस्थिती लक्षात न घेता ७०० पटाच्या शाळा देखील भविष्यात बंद केल्या जातील, असा कोल्हापुरातील डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून खोटा प्रचार केला जात आहे. तसेच त्यांच्याकडून पालकांचीही दिशाभूल केली जात आहे. डॉ. पाटील यांच्याकडे बघूनच चळवळीतील मी सहभाग वाढवला. त्यांचीदेखील या लोकांनी दिशाभूल केली आहे. त्यांच्याशी या विषयावर चर्चा करून हा समाज हिताचा निर्णय असल्याचे त्यांना पटवून देऊ शकतो."

ते म्हणाले, "राज्य शासनातर्फे आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र शिक्षण मंडळाची स्थापना केली आहे.‌‌ मंडळातर्फे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाणार आहे. त्याचा अभ्यासक्रम तयार केला असून, शिक्षकांसाठी २२ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर घेतले जाणार आहे.  या शाळा २५ जूनपासून सुरू होतील."  क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या स्थापनेस मान्यता मिळाली असून १०, १२, १५ महाविद्यालयांचे मिळून स्वायत्त विद्यापीठ साकारले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Vinod Tawade Press