सद्‌गुरू विश्‍वनाथ महाराज रुकडीकर यांचा पुण्यतिथी उत्सव १४ पासून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

कोल्हापूर -  श्री सद्‌गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानमार्फत श्री सद्‌गुरू मुनिंद्र विश्‍वनाथ महाराज रुकडीकर महाराज यांचा ९९ वा पुण्यतिथी उत्सव १४ ते २० जानेवारी दरम्यान होत आहे.

कोल्हापूर -  श्री सद्‌गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानमार्फत श्री सद्‌गुरू मुनिंद्र विश्‍वनाथ महाराज रुकडीकर महाराज यांचा ९९ वा पुण्यतिथी उत्सव १४ ते २० जानेवारी दरम्यान होत आहे. श्री सद्‌गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानमार्फत आयोजित प्रासादिक सोहळ्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, उत्सव सोहळ्यादरम्यान जे साधक श्री ज्ञानेश्‍वरी पारायण करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी श्री विश्‍वपंढरी येथे प्रत्यक्ष संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन केले आहे.

रविवारी (ता. १४) सकाळी आठ ते पावणेदहा दरम्यान पालखी सोहळा, गुरुबाबा औसेकर महाराज यांच्या हस्ते विश्‍वनाथ महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. सकाळी साडेदहा ते साडेबाराला श्री ज्ञानेश्‍वरी पारायण प्रारंभ, सायंकाळी साडेसहा ते साडेसातला सचिन जहागीरदार यांचे प्रवचन, रात्री आठ ते दहाला नारायण महाराज एकल यांचे कीर्तन होईल. सोमवारी (ता. १५) सायंकाळी साडेसहा ते साडेसातला विवेक घळसासी यांचे प्रवचन, रात्री आठ ते दहाला योगीमहाराज गोसावी यांचे कीर्तन होईल.

मंगळवारी (ता. १६) सायंकाळी साडेसहा ते साडेसात वेळेत श्री निवास महाराज पेंडसे यांचे प्रवचन तर रात्री साडेआठ ते दहाला निशिकांत महाराज टेंक्षे यांचे कीर्तन असेल. बुधवारी (ता. १७) सायंकाळी इंद्रजित देशमुख यांचे प्रवचन, रात्री विवेकबुवा गोखले यांचे कीर्तन होईल. गुरुवारी (ता. १८) सकाळी पारायणाची सांगता, त्यानंतर श्री सद्‌गुरू मंगलनाथ महाराज यांचे आशीर्वचन, सायंकाळी पाच ते सहाला श्रींचा पालखी सोहळा, साडेसहा ते साडेसातला श्री माऊली आनंदी पुरस्कार सोहळा, रात्री आठ ते दहाला राजाभाऊ शेंबेकर यांचे गायन होईल.

शुक्रवारी (ता. १९) सकाळी आठ ते साडेनऊला श्री देवनाथायन पारायण, दहा ते बारा वेळेत श्री धर्मनाथ बीज सोहळा, सायंकाळी साडेसहा ते साडेसातला मंगलनाथ महाराज यांचे प्रवचन, रात्री आठ ते दहाला शरद घाग बुवा यांचे कीर्तन होईल.

शनिवारी (ता. २०) सकाळी आठ ते नऊला श्री विश्‍वनाथायण पारायण, दहा ते १२ वेळेत वासुदेवराव जोशी यांचे काल्याचे कीर्तन, दुपारी १२ ते साडेतीनला महाप्रसाद, सायंकाळी सात ते दहा वेळेत दीपोत्सव होईल. आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांचे आशीर्वचन होईल. रोज सकाळी आठ ते १२ वेळेत श्री ज्ञानेश्‍वरी पारायण, सायंकाळी पाच ते सहाला जप साधना होईल.

Web Title: Kolhapur News Vishwanath Maharaj Rukadikar Festival

टॅग्स