स्वातंत्र्य टिकविणे आव्हान - विश्‍वास नांगरे-पाटील 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - लाखो शहीद जवानांच्या बलिदानामुळे आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. बलिदान, त्यागातून मिळालेले हे स्वातंत्र्य टिकविणे हेही आपल्यासमोर एक आव्हान असल्याचे मत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. महापालिकेतर्फे वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी उपस्थित होते. महापौर हसीना फरास अध्यक्षस्थानी होत्या. जागो हिंदुस्थानी या सूरनिनाद संस्थेच्या देशभक्तिपर गीतांनी कार्यक्रमाची शान वाढविली. केशवराव भोसले नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. 

श्री. नांगरे-पाटील म्हणाले, ""स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्म्यांचे स्मरण करणे यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळते. महापालिकेने या कार्यक्रमाद्वारे देशाप्रतीही संवेदनशीलता दाखवून दिली.'' 

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनीही कार्यक्रमाचे कौतुक करीत स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासाला उजाळा दिला. अध्यक्षीय भाषणात महापौर फरास यांनी कार्यक्रमामागचा उद्देश सांगितला. 

कार्यक्रमास उपमहापौर अर्जुन माने, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार, परिवहन सभापती नियाज खान, महिला व बालकल्याण सभापती वहिदा सौदागर, शिक्षण मंडळाच्या सभापती वनिता देठे, सभागृह नेते प्रवीण केसरकर, कॉंग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, प्रभाग समितीचे सभापती अफजल पीरजादे, सुरेखा शहा आदींसह बहुसंख्य नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते. 

बाबूराव हासुरे, कलगौडा पाटील, लहूअण्णा कांबळे, दत्तात्रय कारदगे व सातगौंडा पाटील या स्वातंत्र्यसैनिकांबरोबर वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा सत्कार केला. कंसात शहीद जवानांची नावे आहेत. वृषाली तोरस्कर (महादेव तोरस्कर), निर्मला निउंगरे (गोपाळ निउंगरे), कलावती पाटील (शिवराज पाटील), सुवर्णा मगदूम (शिवाजी मगदूम), अनंत तुपारे (राजेंद्र तुपारे), यशोधा पाटील (मिथुन पाटील), सुरेश कदम (सुभाष कदम), संदीप रेडेकर (दिलीप रेडेकर), मनीषा देसाई (उत्तम देसाई), सुगंधा भिकले (उत्तम भिकले), शिवाजी देसाई (संतोष देसाई), रूपाली भोळे (सुभाष भोळे), छाया इंगळे (संदीप इंगळे), विजय माने (कुंडलिक माने), देवयानी पाटील (साताप्पा पाटील), आनंदी उलपे (दिगंबर उलपे), सुरेखा पोवार (भाऊसाहेब पोवार), आक्काताई साबळे (विजेंद्र साबळे), जनाबाई उंड्रीकर (आनंदा उंड्रीकर), मारुती माने (सावन माने), सुमनदेवी चव्हाण (प्रकाश चव्हाण) यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 

Web Title: kolhapur news Vishwas Nangre Patil