पोलिसांच्या गाड्यांना ‘व्हीटीएस’ आवश्‍यक

लुमाकांत नलवडे
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - एकाच रात्रीत तीन मंदिरांत चोऱ्या झाल्यानंतर आता तरी पोलिसांना गस्तीची आठवण होणार काय? असा प्रश्‍न पुढे येत आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक यशस्वी  यादव यांनी जिल्ह्यात पोलिसांच्या गाड्यावर व्हीटीएस सिस्टीम लावली होती. त्यामुळे पोलिस खरोखरच गस्त घालतात की नाही, यावरही सिस्टीमद्वारे लक्ष ठेवले जात होते. आता पुन्हा एकदा याची गरज आहे. चोऱ्यांचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविणे आवश्‍यक आहे.

पोलिस खमक्‍या असले पाहिजेत, खाकीचा धाक पाहिजे; पण सध्या जिल्ह्यात निर्भया पथकाची कारवाई वगळता पोलिकांचे कामच दिसून येत नाही. गस्त तर नाहीच. प्रत्येक पोलिस ठाण्यातील संबंधित ‘माईक’ तर फिरताना दिसतच नाहीत. त्यामुळेच पोलिसांचा त्यांच्या भागातील संपर्क कमी झाला आहे. 

घडलेली घटना पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठीही उशीर होत आहे. स्टेशन रोड, परीख पूल ही तर लुटीची केंद्र बनली आहेत. तेथेही पोलिसांची गस्त दिसून येत नाही. काल ओढ्यावरील रेणुका मंदिर, जवाहरनगरातील जगदंबा मंदिर, टेंबलाई टेकडीवरील मरगाई मंदिरात चोरीचा प्रयत्न झाला. स्टेशन रोडवर एकाला लुटले, बाबा जरगनगरमध्ये चोरी झाली. आठ-दहा दिवसांपूर्वी डिक्कीतून ६२ हजार रुपये लंपास झाले. हे सर्व होत असतानाही पोलिसांना चोरटे सापडत नाहीत. गुजरीत मुंबईतील सराफाला लुटले. चार महिन्यांपूर्वी रिलायन्स मॉलजवळ एकास लुटले. आर. के. नगर परिसरात महिलेचे दागिने मोपेडच्या डिक्कीतून लंपास केले. यांतील अनेक चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत; तरीही पोलिसांना ते सापडत नाहीत. पोलिसांचा लोकांतील संपर्कच कमी झाला आहे. गस्तीवर कोणीही दिसत नाही. परिणामी चोरांना रान मोकळे झाले आहे. 

पोलिस गस्त घालत नाहीत, तर त्यांच्यावर पर्याय शोधला पाहिजे. काही वर्षांपूर्वी पोलिसांच्या गस्तीवर गस्त घालण्यासाठी व्हीटीएसचा वापर झाला होता. त्यानंतर काही प्रमाणात गस्तीत वाढ होऊन गुन्हे उघडकीस आले होते; मात्र पुढे त्याची देखभाल-दुरुस्ती न झाल्यामुळे पोलिसांनी हे पद्धतशीर बंद पाडले.

Web Title: Kolhapur News VTS needed to Police van