वारणा पाणीप्रश्‍नी शेट्टींची डॉ. एन डी पाटील यांच्याशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

कोल्हापूर - इचलकरंजी शहराला पाणी देण्यास आमचा विरोध नसून शहराला पिण्यासाठी पाणी देण्याची जबाबदारी शासनाची आहे. शेतकऱ्यांना व वारणा नदी काठावरील गावांना पाणी कमी न पडता यावर शासनाने तोडगा काढावा व या तोडग्यासाठी आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहे, शासनाने ही भूमिका सामंजस्यपणे समजावून घ्यावी, असे मत ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी व्यक्त केले. 

इचलकरंजीला वारणेतून पाणीपुरवठा करण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर २२ मे रोजी मुंबईत बैठक होणार आहे. योजनेला डॉ. पाटील यांचाही विरोध आहे. त्यांना वस्तुस्थिती सांगावी या उद्देशाने श्री. शेट्टी यांनी  त्यांची रुईकर कॉलनीतील निवासस्थानी भेट घेतली.

डॉ. पाटील यांनी या प्रकरणात समन्वयकाची भूमिका घेत दोघांनाही योग्य न्याय देऊन या प्रकरणावर लवकरच तोडगा काढावा, अशी विनंती श्री. शेट्टी यांनी केली. मुंबईत होणाऱ्या बैठकीला येण्याचे निमंत्रणही श्री. शेट्टी यांनी त्यांना दिले. त्यावर डॉ. पाटील यांनी नदी काठावरील गावांना पिण्याचे व शेतीचे पाणी कमी पडणार नाही, याची खबरदारी घेऊन तोडगा काढावा, असे सुचवले.

नगरसेवक शशांक बावचकर यांच्यासह विक्रांत पाटील, भगवान काटे आदी उपस्थित होते. प्रा. पाटील यांच्याशी योजनेबाबत चर्चा केली.

निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा - धनवडे
दानोळी - इचलकरंजीची अमृत योजना अन्यायकारक आहे. ती रद्द करण्याची मागणी वारणाकाठचे शेतकरी व नागरिक करीत आहेत, असे असताना २ मे रोजी शेकडो पोलिसांचा दबाव टाकून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्याला आंदोलनकर्त्यांनी संयमाने विरोध केला असताना सत्तेच्या जोरावर खोटे गुन्हे दाखल केले. या सर्व प्रकाराची निवृत न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे यांनी बैठकीत केली.

Web Title: Kolhapur News Warana water issue