वारणा पाणी प्रश्नावर २८ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

संजय खूळ
मंगळवार, 22 मे 2018

इचलकरंजी - वारणा योजनेच्या वादावर समन्वयाने तोडगा काढण्यासाठी आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील व पाणी पुरवठा मंत्री बबन लोणीकर यांची प्रमुख उपस्थीतीत मंत्रालयात बैठक झाली. दोन्ही बाजूकडील प्रतिनिधी आपापल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे ठोस तोडगा निघाला नाही. मात्र पुन्हा 28 मे नंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थीतीत बैठक घेतली जाणार आहे.

दरम्यानच्या काळात तज्ञांची समिती नियुक्ती करुन या योजनेबाबतच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 
खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ विचारवंत एन. डी. पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, नगराध्यक्षा अलका स्वामी, महादेव धनवडे, रावसाहेब भिलवडे, आमदार उल्हास पाटील आदींनी बाजू मांडली.

ग्रामस्थांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली. याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. बैठकीत कांही विषयांवर वादावादी झाली. 

बैठकीस कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार अशोकराव जांभळे, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके, उपनगराध्यक्षा सरीता आवळे, मदन कारंडे, राजेंद्र पाटील- यड्रावकर, गणपतराव पाटील, नगरसेवक तानाजी पोवार, शशांक बावचकर, रविंद्र माने, सागर चाळके, अजितमामा जाधव, सुनिल पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, जल अभियंता अजय साळुंखे, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे आदी उपस्थीत होते. 

महत्वाचे निर्णय 

  • मुख्यमंत्र्यांसमवेत 28 मे नंतर बैठक 
  • चार दिवसांत कोल्हापूरात होणार बैठक 
  • तज्ञांची समिती नेमून शंका दूर करणार 
  • दानोळीतून उपसा करण्याचा आग्रह नाही 

Web Title: Kolhapur News Warana water issue