वारणेच्या पाण्यासाठी सोमवारी इचलकरंजीत बंद

पंडित कोंडेकर
रविवार, 13 मे 2018

इचलकरंजी -  वारणा योजनेचे पाणी मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी सोमवारी इचलकरंजी बंदची हाक देण्यात आली आहे.  पुकारलेल्या इचलकरंजी बंदच्या पार्श्वभूमीवर कॉर्नर सभांच्या माध्यमातूम जागृती करण्यात येत आहे. दरम्यान पालिकेत झालेल्या एका बैठकीत बंद बाबतच्या तयारीचे प्राथमिक नियोजन करण्यात आले.

वारणा योजनेचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी विविध टप्प्यावर आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षीय नेते मंडळी एकत्र आले आहेत. पहिल्या टप्प्यात सोमवारी इचलकरंजी बंदची हाक देण्यात आली आहे.
बंद यशस्वी करण्यासाठी विविध प्रकारे जागृती करण्यात येत आहे. सोशल मिडीयातून बंद मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी शहर बंद ठेवून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चात जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होण्यासाठी कॉर्नर सभा घेण्यात येत आहेत. शनिवारी झालेल्या सभांना नागरीकांचा प्रतिसाद मिळाला. नगरसेवकांनी आपापल्या भागात या सभा घेवून वारणा योजना का महत्वाची आहे, हे नागरीकांना पटवून देत आहेत. सोशल मिडीयातून ही जागृती केली जात असून अनेकांनी बंदमध्ये सहभागी होण्याबाबत आवाहन केले आहे. पालिकेतील एका बैठकीत इचलकरंजी बंद व प्रांत कार्यालयावर काढण्यात येत असलेल्या मोर्चाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार आवश्यक ती तयारी करण्यासाठी पालिकेची यंत्रणा सक्रीय झाली आहे.

Web Title: Kolhapur News Warana Water issue in Ichalkaraji

टॅग्स