वारणानगर चोरीप्रकरणी चंदनशिवे, पाटील, मुल्लावर दोषारोपत्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

कोल्हापूर -  वारणानगर कोट्यवधीच्या चोरीप्रकरणी संशयित पोलिस अधिकारी सूरज चंदनशिवे, दीपक पाटील आणि मुख्य संशयित मैनुद्दीन मुल्ला या तिघांवर सीआयडीने पन्हाळा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांतील या  तिघांविरोधात ठोस पुरावे दोषारोप पत्रात 
नमूद आहेत. 

कोल्हापूर -  वारणानगर कोट्यवधीच्या चोरीप्रकरणी संशयित पोलिस अधिकारी सूरज चंदनशिवे, दीपक पाटील आणि मुख्य संशयित मैनुद्दीन मुल्ला या तिघांवर सीआयडीने पन्हाळा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांतील या  तिघांविरोधात ठोस पुरावे दोषारोप पत्रात 
नमूद आहेत. 

वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील फ्लॅट चोरीचा छडा लागला. याप्रकरणी मुल्लाला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोट्यवधीची रोकड जप्त केली. या प्रकरणी कोडोली (ता. पन्हाळा) पोलिस  ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दरम्यान, चोरीला गेलेल्या रोकड विषयी फिर्यादी झुंझार सरनोबत यांनी शंका व्यक्त केली. त्यानंतर त्याचा स्वतंत्र तपास तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी केला. यात  तपासाच्या नावाखाली पोलिसांनीच कोट्यवधीचा डल्ला मारल्याचा प्रकार पुढे आला. प्रकरण राज्यभर गाजले. 

पन्हाळा न्यायालयात ६ कोटींच्या गुन्ह्यात चंदनशिवे  आणि दीपक पाटील याच्यावर पन्हाळा न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. हे पत्र सुमारे ८०० पानांचे आहे. त्यापूर्वी २३ जानेवारीला ३ कोटी १८ लाखांच्या  चोरीच्या गुन्ह्यात संशयित मुल्लावर दोषारोपपत्र दाखल केले. हे ६०० पानांचे आहे. यामध्ये त्या तिघांचे व साक्षीदारांचे जबाब. त्यांचे कॉल डिटेल्स्‌, मोबाईल लोकेशन, छाप्यात घरातून मिळालेले दस्ताऐवज व ठोस पुरावे यात नमूद आहेत. 
- नरेंद्र गायकवाड, 

अप्पर पोलिस अधीक्षक, सीआयडी

याबाबत ६ व ३ कोटींच्या चोरीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. यात संशयित निलंबित पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, सूरज चंदनशिवे, दीपक पाटील, शंकर पाटील, रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे, शरद कुरळपकर, मैनुद्दीन मुल्ला आणि प्रवीण सावंत अशा नऊ जणांवर गुन्हे दाखल झाले. हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना अटक केली. यातील शरद कुरळपकर हा हाती लागला नाही. याचा पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: Kolhapur News warananagar robbery case