महाडिकांना ५ हजार बिल कसे?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

कोल्हापूर - ‘२०० खोल्यांच्या हॉटेलला चार हजारांचे पाण्याचे बिल आणि महादेवराव महाडिक यांच्या बंगल्यातील तीन माणसांना पाच हजारांचे बिल कसे?’ असा सवाल सुनील कदम यांनी आज केला. हॉटेल. मंगल कार्यालयातील पाणी चोरी पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी फिरती करावी, असे आवाहन सत्यजित कदम यांनी केले.

सुनील कदम म्हणाले, ‘‘२०० खोल्यांच्या हॉटेलला व्हॉल्व्ह बसवून पाणी दिले जाते. हॉटेल ओपल ६० हजार ते एक लाखापर्यंत पाण्याचे बिल भरते. मात्र, २०० खोल्यांच्या हॉटेलला चार हजारांचे बिल. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा रुईकर कॉलनीत बंगला आहे. तेथे तीन माणसे वास्तव्यास आहेत. त्यांना पाच हजारांचे बिल येते.

पाणी बिल वाटपाच्या यंत्रणेतील ‘महामेरू’ शोधून काढायला हवा. झोपडपट्टीतील गरीब माणसांना एक न्याय आणि हॉटेलवाल्यांना एक न्याय हे योग्य नाही. पाणी अन्यत्र वळविल्याने कावळा नाका टाकी पूर्ण क्षमतेने भरत नाही. ‘ई’च्या २७ वॉर्डमधील नागरिक पाण्यासाठी तहानलेले आहेत. सर्वाधिक महसूल याच वॉर्डमधून मिळतो. ताराबाई पार्क टाकीची इतकी वाईट अवस्था आहे की, टाकी लोकांनी पाहिली तर पाणीही कुणी पिणार नाही. ‘न्हाणीला बोळा आणि दरवाजा उघडा’ अशी अवस्था आहे. 

किरण नकाते यांनी पन्नास टक्के पाण्याची चोरी होत असल्याकडे लक्ष वेधले. सत्यजित कदम यांनी प्रत्येकी दहा मंगल कार्यालये आणि हॉटेलच्या पाण्याची एकदा झाडाझडती घ्या. ११० एमएलडी पाण्याची चोरी होते, ही काय भानगड आहे? असा सवाल केला.

Web Title: Kolhapur News water bill issue