महिलेने लगावली तरुणाच्या कानशिलात (व्हिडिआे)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

कोल्हापूर - मोपेडला धडक देऊन पळालेल्या तरुणांचा पाठलाग करून महिलेने त्यांच्या कानशिलात लगावली. मिरजकर तिकटी येथे ही घटना घडली. पोलिसांनी संबंधित तरुणावर दंडात्मक कारवाई केली. महिलेचे हे धाडस सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर महिलेचे कौतुक झाले.

कोल्हापूर - मोपेडला धडक देऊन पळालेल्या तरुणांचा पाठलाग करून महिलेने त्यांच्या कानशिलात लगावली. मिरजकर तिकटी येथे आज दुपारी ही घटना घडली. पोलिसांनी संबंधित तरुणावर दंडात्मक कारवाई केली. महिलेचे हे धाडस सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर महिलेचे कौतुक झाले.

एक महिला मोपेडवरून जाताना मागून येणाऱ्या दोन तरुणांनी त्यांच्या मोपेडला ठोकर दिली. तेथून त्यांनी पळ काढला; महिलेने त्यांचा पाठलाग करून मिरजकर तिकटीला गाठले. त्यांच्या मोपेडच्या आडवी मोपेड लावून त्यांना थांबवले आणि तरुणाच्या कानशिलात लावण्यास सुरुवात केली. काही क्षणात वाहने थांबली. महिलेने संबंधित तरुणाचा हात धरून त्याला दम दिला. याच वेळी चौकात असलेले दोन पोलिस तेथे हजर झाले. त्यांनी काय झाले, हे विचारताना मोपेडला धडक देऊन आला आहे. सॉरीही म्हटले नाही. दादा गाडी बाजूला घे म्हणून सांगितले तरीही तो पळून आला आहे, असे पोलिसांना सांगितले. ही व्हिडिओ क्‍लीप दिवसभर सोशल मीडियावर आणि टीव्ही चॅनेलवर दिसत होती. 

Web Title: Kolhapur News womens Courage story