इरादे हो पक्के.. तो बेटीया.. जितेंगी दुनिया...

संदीप खांडेकर
गुरुवार, 8 मार्च 2018

देसाई कुटुंबीयांच्या जुळ्या मुलींकडे पाहिल्यानंतर असेच शब्द कोणाच्याही तोंडून बाहेर पडतील. सनाला दहावीला साठ, तर सलिनालाही साठ टक्के. बारावीत दोघींची टक्केवारी साठच. दोघींच्या आवडी-निवडीही सेम. त्यामुळे दोघींतील सना कोण आणि सलिना कोण, हे ओळखणेच कठीण. विशेष म्हणजे उर्दू माध्यमातून शिक्षण घेतलेल्या या दोघींनी कायद्याची पदवी मिळविण्याचा आता निर्धार केला आहे.

कोल्हापूर - ‘बेटी तो बेटी होती है!
अफसोस मत करना
इरादे हो पक्के
तो बेटी जितेगी दुनिया’..

देसाई कुटुंबीयांच्या जुळ्या मुलींकडे पाहिल्यानंतर असेच शब्द कोणाच्याही तोंडून बाहेर पडतील. सनाला दहावीला साठ, तर सलिनालाही साठ टक्के. बारावीत दोघींची टक्केवारी साठच. दोघींच्या आवडी-निवडीही सेम. त्यामुळे दोघींतील सना कोण आणि सलिना कोण, हे ओळखणेच कठीण. विशेष म्हणजे उर्दू माध्यमातून शिक्षण घेतलेल्या या दोघींनी कायद्याची पदवी मिळविण्याचा आता निर्धार केला आहे.

घरचा उंबरठा ओलांडून स्वत:ला सिद्ध करण्याचा त्यांचा संकल्प आहे. सना व सलिनाचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण जवाहरनगर स्कूलमध्ये, तर आठवी ते दहावीपर्यंतचे नेहरू हायस्कूलमधून झाले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर दोघींनी कमला महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी प्रवेश घेतला. बारावीत त्यांना साठ टक्के मिळाल्यानंतर पुढे काय, असा प्रश्‍न उभा राहिला. कुटुंबीयांनी दोघींना वकील करण्याचा निर्णय घेतला आणि भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आहे. 

सना व सलिनाला एक मोठा भाऊ आहे. तो कंपनी सेक्रेटरीच्या अभ्यासासाठी पुण्यात आहे. या दोघींची विशेष अशी केमिस्ट्री आहे. दोघींचा पोशाख असो, अभ्यास असो अथवा आवड असो, या सारख्याच आहेत. दोघी सध्या उज्ज्वल डान्स ॲकॅडमीत साहील भारती यांच्याकडून नृत्याचे प्रशिक्षण घेत आहेत. दोघींचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे त्या विविध कार्यक्रमांत उत्तम सूत्रसंचालक म्हणून काम करतात. त्याचबरोबर नाटकांतही भूमिका साकारतात. कुटुंबीयांचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्याचा त्यांना अभिमान आहे. 

कुटुंबीयांनी आम्हाला प्रोत्साहन दिल्यामुळेच आम्ही आता वकिलीचे शिक्षण घेत आहोत. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समाजासाठी काम करायचे आहे.
- सना व सलिना

Web Title: Kolhapur News world women day special