महिला राज "लक्ष्मी'  ( व्हिडिआे स्टोरी)

बी. डी. चेचर
बुधवार, 7 मार्च 2018

कोल्हापूर -  मुली किंवा महिला म्हंटले की एकाचवेळी अनेक काम करण्याची कला त्यांना अंगभूतच. उचगाव (ता. करवीर) येथील राजलक्ष्मी पोवार नेमबाजीसह जलतरण आणि टेम्पो, मोबाईल व्हॅन चालवण्यातही माहिर. जागतिक महिला दिनानिमित्त तिची ही प्रेरणादायी कथा.

राजलक्ष्मी वडिलांचा गवळी व्यवसाय असल्याने चार-पाच गावातील शेतकऱ्यांचे दुध गोळा करुन ते ऍपे रिक्षाने आणून शहरात विक्री करतात. त्यांना मदत म्हणून ऍपे रिक्षा त्या शिकल्या. एकीकडे घरचा भार सांभाळत त्यांचे शिक्षणही सुरू आहे. आता तर "स्वयंसिध्दा' संस्थेच्या स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्यौगिक संस्थेमध्ये मोबाईल व्हॅनवर ड्रायव्हर म्हणूनही तितक्‍याच आत्मविश्‍वासाने ती काम करते आहे.

मोबाईल व्हॅन ठरलेल्या ठिकाणी थांबवून स्टॉल लावला की रिकामा वेळ मिळतो. मिळणारे हे किमान चार ते पाच तासात विश्रांती न घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास ती करते. दुपारी साडेतीनला त्यांची मोबाईल व्हॅन बाहेर पडते व शहरातील विविध भागात तिचा दौरा ठरलेला असतो. या कामातून मिळणाऱ्या मानधनातून स्पर्धा परीक्षांसाठी आवश्‍यक तो खर्च ती करते.  

Web Title: Kolhapur News world women day special video story