शाहुवाडी तालुक्यात कुस्ती मैदानात मल्ल जखमी

संभाजी थोरात
बुधवार, 4 एप्रिल 2018

कोल्हापूर - करवीर नगरीत कुस्तीची परंपरा जपली जावी म्हणून अनेक मल्ल जिवाचं रान करुन कुस्तीत सहभागी होतात. हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पटकावून करवीर नगरीचं नाव उज्वल करण्याच स्वप्न अनेक मल्ल पाहतात. पण कुस्ती खेळत असताना मल्लावर कोणता प्रसंग येईल हे सांगता येत
नाही. अशीच एक घटना जोतिबा यात्रेनिमित्त शाहूवाडी तालुक्यातील बांदवडे इथे भरवण्यात आलेल्या कुस्ती मैदानात घडली.

पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी इथला निलेश विठ्ठल कंदूरकर हा
प्रतिस्पध्यविरुद्ध कुस्ती खेळत होता. प्रतिस्पर्धा मल्लानं टाकलेल्या एकचक्री डावातून सहीसलामत निसटण्यासाठी निलेश जोरदार प्रयत्न करत होता. निलेशने वेगाने हालचाल सुरु केली. याच हालचालीमुळे निलेश सुटला खरा, पण त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तो मैदानात कोसळला. आयोजकांनी धाव घेवून, निलेशला तत्काळ कोल्हापुरातील शाहूपुरी इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी निलेशला मणक्यासह स्पायनल काॅडला गंभीर दुखापत झाल्याची माहिती दिली. प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगितले. दोन दिवसांच्या उपचारानंतर निलेशला एका मोठ्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही बाब लक्षात येताच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
यांच्या सहकार्याने विजय जाधव यांच्या पुढाकाराने मुंबईकडे पुढील उपचारासाठी पाठवले मात्र प्रकृती अस्वस्थेमुळे वाटेतील कराड येथील कृष्णा रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार केले जात आहेत.

निलेश सर्व घटनेतून लवकर बरा व्हावा, अशी अपेक्षा त्याचा मित्र परिवार करत आहे. निलेशचे स्वप्न हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी होण्याचे आहे. 

Web Title: Kolhapur News wrestler injured during Wrestling