कुस्तीच्या मैदानातील ‘दीप’....

राजू पाटील
गुरुवार, 22 मार्च 2018

राशिवडे बुद्रुक - ‘सांगा कसं जगायचं... कण्हत कण्हत की गाणं म्हणत....’ या मंगेश पाडगावकरांच्या कवितेचा अर्थ समजून गाणं म्हणत जगणं यालाच आयुष्य म्हणतात. आपल्यात काय कमी आहे, याचं रडगाण गाण्यापेक्षा मी काय करू शकतो, ही जिद्दच माणसाला मोठं करते. याची प्रत्येकाला जाणीव करून देतो आहे एक अंध मल्ल. जो सध्या यात्रांतील मैदानांत काटाजोड मल्लांशी दोन हात करतो. जिंकण्यापेक्षाही त्याने जीवनावर विजय मिळवण्याची केलेली जिद्द मोठी आहे. 

कुलदीप केदारी पाटील या कसबा वाळव्याच्या पैलवानाच्या जिद्दीची ही कथा. नावाप्रमाणेच घराचा कुलदीपक असलेला हा जन्मतःच अंध. आई-वडिलांनी खूप प्रयत्न केले, पण दृष्टी आली नाही. समोर काहीतरी हालचाल आहे, असं कळण्यापुरतं धोतराच्या चार पदरातून पाहावं इतकंच डोळ्यांना कळतं. हा किरणच जीवनात प्रकाशमान होण्यासाठी पुरेसा आहे, असे मानून तो नेटाने लढू लागला. वडील गावातील हायस्कूलवर सेवेत होते. त्यांच्या साथीने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. परीक्षांसाठी लिपिकाची मदत घेतली. कुलदीपची कुस्तीची आवड लक्षात घेऊन वडिलांनी त्याला गावातील सर्जेराव तालमीत पाठवण्यास सुरुवात केली. तिथे मारुती पाटील वस्तादांनी त्याला घडवले. दृष्टी नसताना कुस्तीत डाव कसे ओळखायचे याचे धडे दिले. समोरच्या मल्लाचा काहीही झाले तरी हात सोडायचा नाही, हात धरूनच अंदाज हेरायचा हे शिकवलं आणि तो पैलवान झाला. 

आज तो वीस-बावीसच्या आसपास आहे, अनेक मैदानांत गाजतोय. पण त्याचं कौतुक पाहायला त्याचे डोळे बनून राहिलेल्या वडिलांची साथ नाही. दोन वर्षांपूवी कुलदीप पोरका झाला. सध्या गावोगावी यात्रांची मैदानं गाजताहेत. 
जमेल तिथे जोडीदारांच्या साथीने तो जातो आणि कुस्तीसाठी मैदानात उतरतो. खुल्या गटातून खुल्या मैदानात तो खेळतो, मैदानात त्याची अटही असते ती म्हणजे माझ्या ताकदीचा किंवा उजव्याच मल्लाशी माझी जोड लावा. केवढी ही जिद्द... कोण हा आत्मविश्‍वास. ‘जीवन गाणे गातच राहावे...’ हेच त्याच्याकडून शिकावं अशीच त्याची वाटचाल आहे.

Web Title: Kolhapur News wrestling player Kuldeep Patil Special story