उद्याचे आम्ही कुस्तीवीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

कोल्हापूर - मला महाराष्ट्र केसरी,  हिंदकेसरी व्हायचे आहे, ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे माझे स्वप्न आहे, मला कुस्तीत करिअर करायचे आहे, अशी अशी स्वप्ने डोळ्यांत घेऊन ग्रामीण भागातील छोट्या मुलांनी आजोबा, वडील, काका यांच्या पावलावर पाऊल ठेवत शड्डू ठोकला आहे.

कोल्हापूर - मला महाराष्ट्र केसरी,  हिंदकेसरी व्हायचे आहे, ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे माझे स्वप्न आहे, मला कुस्तीत करिअर करायचे आहे, अशी अशी स्वप्ने डोळ्यांत घेऊन ग्रामीण भागातील छोट्या मुलांनी आजोबा, वडील, काका यांच्या पावलावर पाऊल ठेवत शड्डू ठोकला आहे.

भारतीय खेल प्राधिकरणाच्या (साई) दत्तक आखड्याकरिता निवड चाचणीत दोनशेहून अधिक मुलांनी सहभाग नोंदविला. पासष्ट मुलांशी संवाद साधल्यावर कुटुंबास कुस्तीची परंपरा नसताना चौदा मुले कुस्तीत नशीब आजमावण्यासाठी उतरल्याची माहिती पुढे आली. जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मोतीबाग तालमीमध्ये निवड चाचणीचे आयोजन केले होते. चंद्रकांत चव्हाण, अजय सिंग, प्रकाश खोत, कृष्णात पाटील, संदीप पाटील, बाजीराव बागदार, दादू चौगुले, पी. जी. पाटील यांनी संयोजन केले.

  •  वयोगट - आठ ते चौदा
  •  निवड झाल्यानंतर दर महिन्यास एक हजार रुपये मानधन
  •  तीन हजार रुपये  किटसाठी
  •  आखाड्यात ४० मुलांची होणार निवड
  •  दोन महिन्यांनंतर लागणार निकाल

निवड चाचणीतील प्रकार
दहा बाय सहा शटल रन, ब्रीज मारणे, तीस मीटर फ्लाईंग स्टार्ट, आठशे मीटर धावणे, डाव मारणे, उभे राहून उडी मारणे, सिट अप्स, बॉल थ्रो.

यांना व्हायचे आहे पैलवान : 
ओम चौगुले (आळवे), आदर्श मगदूम (भामटे), सुदेश लाड (आळवे), सिद्धनाथ पाटील (आमशी), ओंकार गायकवाड (दऱ्याचे वडगाव),  जिनदर्शन शिरगुप्पे (पट्टनकोडोली), आदर्श पाटील (आमशी), ओमकार पाटील (पाचगाव), बालाजी भोसले (कांचनवाडी), विघ्नेश चौगुले (नंदगाव), सनी रानमाळे (इस्पुर्ली), आयुष खोत (चांदेकरवाडी),  यश पाटील (बेलवळे बुद्रूक), शाहू कुराडे (नंदगाव).

या गावातील सहभागी मुले
कळंबे, नंदगाव, पिंपळगाव, कोतोली, कोगे, भामटे, पट्टणकोडोली, आळवे, तिटवे, चांदेकरवाडी, बांदिवडे, लिंगनूर, आमशी, शिरोळ, पाचगाव, महे, पाटेकरवाडी, पिरवाडी, तिरपण, कांचनवाडी, व्हन्नाळी, सडोली, साके,  कळंबा, तुर्केवाडी, शित्तूर.

मला महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवायचा आहे. ते माझे स्वप्न आहे. कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर ठळक करायचे आहे.
- सुशांत पाटील
(कोगे)

मी पैलवान आहे. माझ्या मुलाने पैलवानच व्हावे, ही माझी इच्छा आहे. त्यामुळे त्याला निवडीसाठी घेऊन आलो. 
- पैलवान तानाजी पाटील
(शित्तूर)

 

Web Title: Kolhapur News Wrestling wrestler special story