व्हाॅट्सअपवर अश्‍लिल संदेश पाठविणाऱ्या मुलांची धुलाई 

सुनील पाटील
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर -  तरूणींना अश्‍लिल संदेश पाठवून त्यांचे फोटो काढणाऱ्या चौघा तरूणांना तरूणींच्या पालकांनी बेदम चोप दिला. ताराराई पार्क येथील एका मार्गदर्शन केंद्रातील हे सर्व विद्यार्थी आहेत. या केंद्रात जावून त्या तरूणांना चोप देण्यात आला. या चौघा तरूणांनी सहा तरूणींची छेड काढली. या प्रकरणी स्टॅंपपेपवर वर हमीपत्र घेवून हे प्रकरण मिटवण्यात आले. 

कोल्हापूर -  तरूणींना व्हाट्सअपवर अश्‍लिल संदेश पाठवून त्यांचे फोटो काढणाऱ्या चौघा तरूणांना तरूणींच्या पालकांनी बेदम चोप दिला. ताराराई पार्क येथील एका मार्गदर्शन केंद्रातील हे सर्व विद्यार्थी आहेत. या केंद्रात जावून त्या तरूणांना चोप देण्यात आला. या चौघा तरूणांनी सहा तरूणींची छेड काढली. या प्रकरणी स्टॅंपपेपवर वर हमीपत्र घेवून हे प्रकरण मिटवण्यात आले. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील ताराबाई पार्कात  मार्गदर्शन घेणाऱ्या कोल्हापूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील सहा तरूणींनींच्या नावाने काही तरूणांनी व्हॉटसग्रुपवर अश्‍लिल संदेश पाठविले. या ग्रुपवर एक शिक्षकही होते. या शिक्षकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधीत मुलींना त्यांनी हा प्रकार केंद्र प्रशासनाच्या कानावर घालण्यास सांगितला. कोणत्याही मुलीला आणि पालकांचा संताप पराकोटीला जाईल, असे हे संदेश उघड झाल्यानंतर मुलींनी व पालकांनी आज सकाळीच या केंद्र चालकांना जाब विचारला. संबधीत केंद्र चालक अधिकाऱ्यांच्या समोर ही रूजवात झाली. त्यांचे मोबाईल तपासणी केल्यावर अश्‍लिल संदेश पाठविलेले उघड झाले आहे. हे सर्व संदेश पाहिल्यानंतर त्या चार तरूणांची धुलाई केली. यातील काही मुलांनी संबधीत मुलींचे फोटो आपल्या मोबाईलच्या डीपीवर ठेवून मुलींची बदनामी केली आहे. ज्या नंबरवर त्या मुलींचा फोटो डीपी म्हणून ठेवला आहे. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तो वारंवार बंद लागत होता. याचवेळी हे प्रकरण पोलीसांपर्यंत नेण्याची तयारी मुलींनी दर्शविली. केंद्र चालकांसमोर ही बाब समोर आल्यानंतर प्रशासनाने हे प्रकरण पोलीसांकडे नेण्याऐवजी संबधीत मुलांच्या पालकांकडून हमीपत्र घेवूनच त्यावर पडदा टाकला. 

Web Title: Kolhapur News wrong messages on girls whats-app incident