बाजी कोण मारणार याचीच उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - ‘यिन’ प्रतिनिधीपदासाठी चुरशीने झालेल्या मतदानाने सायबर महिला महाविद्यालय व महावीर महाविद्यालयातील मतदारांची उत्सुकता ताणली आहे. निवडणुकीत कोण विजयी होणार, याचीच मतदानानंतर चर्चा रंगली. निवडणुकीचा ‘फिव्हर’ इतका राहिला, की मतदानानंतर मतदार विद्यार्थी-विद्यार्थिनींना ‘सेल्फी’चा मोह आवरता आला नाही. डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) निवडणूक झाली. उद्या (ता. १२) मतमोजणी होणार असून निकाल सकाळी अकराला जाहीर केला जाणार आहे. 

तरुणाईतील नेतृत्वाला आकार देणाऱ्या या निवडणुकीने दोन्ही महाविद्यालयातील वातावरण तापले होते. प्रचारात उमेदवारांनी कोणतीच कसूर ठेवली नव्हती. आज मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुकीत कोण बाजी मारणार, याचा अंदाज बांधणेच कठीण होते. सायबर महिला महाविद्यालयात सकाळी दहा वाजता मतदान प्रक्रियेस सुरवात झाली. स्मिता विजयकुमार पोतदार (फूड टेक्‍नॉलॉजी विभाग, भाग-दोन), शिवानी शिवाजी पाटील (फूड टेक्‍नॉलॉजी, भाग-एक) या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. दोघींनी केलेला प्रचार पाहता मतदार विजयाचे पारडे नेमके कोणाच्या बाजूला झुकवणार, हे समजण्याच्या पलीकडे होते. येथे मतदारांनी उत्स्फूर्त मतदान करत निवडणुकीची रंगत वाढवली. सचिन कासार व विश्‍वनाथ चव्हाण यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. प्राचार्य डॉ. विद्या साळोखे, शर्वरी इंगवले, आकांक्षा नीळकंठ, श्रद्धा गाडगीळ, मानसी हावळ यांनी सहकार्य केले. 

महावीर महाविद्यालयात सोनाली विठ्ठल पाटील (बीएड. भाग- ३), प्रिती चंद्रकांत महापुरे (बीएड. भाग - ३) या दोघी प्रतिस्पर्धी उमेदवार होत्या. त्यांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठी भेटींवर जोर दिला होता. वर्गनिहाय जोरदार प्रचार करत त्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर दिला होता.

सकाळी अकरा वाजता मतदानास सुरवात होताच मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या. दुपारी एकपर्यंत ऑफलाईन पद्धतीने मतदान झाले. उत्तम सावंत व अभिषेक श्रीराम यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. प्राचार्य डॉ. आर. बी. लोखंडे, प्रा. अंकुश गोडगे, रोहन शारबिद्रे यांनी सहकार्य केले. इचलकरंजीतील डी. के. टी. ई. मध्ये गिरीश सुभाष शिंगे (टेक्‍स्टाईल टेक्‍नॉलॉजी, भाग-तीन) हा पदव्युत्तर, तर आदित्य सुमंत वडर या पदवी विभागातून बिनविरोध विजयी झाला.

Web Title: kolhapur news yin election