योगेश राणेसह तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

कोल्हापूर - कळंबा येथून एजंटाचे अपहरण करून २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुंड योगेश राणेसह तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन आलिशान मोटारीही जप्त केल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली. 

कोल्हापूर - कळंबा येथून एजंटाचे अपहरण करून २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुंड योगेश राणेसह तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन आलिशान मोटारीही जप्त केल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली. 

अटक केलेल्या संशयितांची नावे ः योगेश बाळासाहेब राणे (वय ३४, रा. शाहूपुरी पाचवी गल्ली), आकाश आनंदा आगलावे (रा. न्हाव्याचीवाडी, शेळोली, भुदरगड) आणि मारुती मधुकर कांबळे (रा. निगवे खालसा, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत.
निगवे खालसा येथील विजय निवृत्ती कांबळे कर्ज मिळवून देण्याचे काम करतात. मारुती कांबळे भागीदार होता. दोघांत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे विजय कांबळे यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. याचा राग मारुतीला होता. त्याने मित्र आकाश आगलावेला याबाबत सांगितले. त्याच्या संपर्कातून हे प्रकरण योगेश राणेपर्यंत पोचले. त्याने विजय कांबळे यांचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा कट रचला. त्यासाठी मोटार आणि काही साथीदारांचीही सोय केली.

३० एप्रिल २०१८ ला विजय कांबळे यांना राणेच्या साथीदारांनी फोन केला. भावाचे लग्न ठरले आहे, कर्ज प्रकरण करून द्या, तुमचे जे कमिशन आहे, ते घ्या असे सांगत कळंबा नाक्‍याजवळ बोलवून घेतले. तेथे राणेसह साथीदारांनी जबरदस्तीने कांबळेंना मोटारीत बसविले. आताच्या आता २५ लाख रुपये दे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. 

७८ हजारांची खंडणी केली वसूल
अपहरण केल्यानंतर विजय कांबळे यांच्या ‘एटीएम’मधून पाच हजार रुपये आणि सोन्याचे दागिनेही गहाण ठेवण्यास भाग पाडले. दागिने गहाण ठेवून मित्राने सायबर चौकात कांबळे यांना ७३ हजार ५०० रुपये दिले, असे अपहरणकर्त्यांनी ७८ हजार ५०० रुपयांची खंडणी वसूल केली.

Web Title: Kolhapur News Yogesh Rane arrested