पोलिसाकडून तरुणाला बेदम मारहाणीचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

कोल्हापूर - राजारामपूरी मातंग वसाहत येथील एका तरुणाला एका पोलिसाने बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप करत संबंधित तरुणाच्या नातेवाइकांनी सीपीआर परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास गोंधळ घातला.

कोल्हापूर - राजारामपूरी मातंग वसाहत येथील एका तरुणाला एका पोलिसाने बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप करत संबंधित तरुणाच्या नातेवाइकांनी सीपीआर परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास गोंधळ घातला.

मार्शल मुकुंद गर्दे (वय २२) असे त्याचे नाव आहे. गर्दे व त्याचा मित्र उमेश साळुंखे सीबीएसशेजारी एका हॉटेलपाशी उभे होते. तेथे अन्य एकाशी वाद झाला. त्याने तू कोण मला सांगणार, मी पोलिस आहे, असे म्हणत गर्देला मारहाण केली. त्यात तो बेशुद्ध पडला. मित्राने त्याला सीपीआरमध्ये आणले. तेथे नातेवाइकांनी पोलिसांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. गर्देला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.  हा प्रकार समजल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर सीपीआरमध्ये आले. नातेवाईकांनी त्यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. पोलिसाला अटक करा, अशी मागणी केली. 

Web Title: Kolhapur News youngster bitten by Police

टॅग्स