कर्करोगाला कंटाळून कोल्हापूरात तरूणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

गोकुळ शिरगाव - कणेरी (ता करवीर)  येथील एका तरुणाने कर्करोगाला कंटाळून आत्महत्या केली. संतोष यशवंत सुतार असे या युवकाचे नाव आहे. ही घटना आज सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली.

गोकुळ शिरगाव - कणेरी (ता करवीर)  येथील एका तरुणाने कर्करोगाला कंटाळून आत्महत्या केली. संतोष यशवंत सुतार असे या युवकाचे नाव आहे. ही घटना आज सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार सुतार यांना तोंडाचा कर्करोग झाला होता. त्यामुळे ते अनेक दिवसापासून अंथरूणावर पडून होते. तोंडाच्या कर्करोगामुळे त्यांना खाता-पिता येत नव्हते. अशा अवस्थेमुळे ते या आजाराला कंटाळले होते. यातूनच त्यांनी आज राहात्या घरातल्या पंख्यास दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहायक फौजदार हजारे हे करीत आहेत. 

Web Title: Kolhapur news Youth suicide in Kaneri