झंवर समूहाचा देशातील पाच नामांकित उद्योगांत समावेश

झंवर समूहाचा देशातील पाच नामांकित उद्योगांत समावेश

नागाव - दर्जा आणि सेवेच्या बाबतीत भारतातील नामांकित पहिल्या पाच फाउंड्री उद्योगांत झंवर उद्योग समूहाचा समावेश आहे. कोल्हापूरच्या फाउंड्री उद्योगातील भीष्माचार्य म्हणून संबोधले जाणारे ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांनी १९८४ - ८५ मध्ये श्रीराम फाउंड्री या नावाने लावलेल्या रोपट्याचे मुलगा नरेंद्र झंवर आणि नातू नीरज झंवर व रोहन झंवर यांच्या एकत्रित प्रयत्नांतून आज झंवर उद्योग समूह या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. 

समूहात रामप्रताप झंवर यांच्या नातसूनांनी सौ. जिया झंवर व सौ. अंकिता झंवर यांनी ठराविक विभागांची जबाबदारी स्वीकारून कंपनीच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत ठेवला आहे. मोठी उलाढाल आणि एकत्रित कुटुंबव्यवस्थेमधील प्रत्येक सदस्याने स्वीकारलेली जबाबदारी, अशी उदाहरणे फार क्वचित असतील. 

अध्यक्ष रामप्रताप झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र झंवर, कार्यकारी संचालक नीरज झंवर व रोहन झंवर, सौ. जिया यांनी पर्चेस व आयटी आणि सौ. अंकिता यांनी मनुष्यबळ विकास व्यवस्थापनाच्या माध्यमातून कंपनीच्या विस्तार प्रक्रियेत दिलेल्या योगदानामुळे हा ग्रुप यशाची नवी शिखरे पादाक्रांत करत आहे.  समूहामध्ये पाच फाउंड्री आणि दहा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित मशिन शॉप आहेत. सुमारे तीन हजार कुटुंबे थेट समाविष्ट आहेत. दहा ते बारा लहान फाउंड्री आणि पन्नासहून अधिक लघुउद्योग झंवर उद्योग समूहावर अवलंबून आहेत. यावरून या समूहाचा व्याप लक्षात येतो. झंवर उद्योग समूहाची वार्षिक कास्टिंग उत्पादनक्षमता एक लाख टन एवढी आहे. वार्षिक उलाढाल सहाशे कोटी आहे. कागल पंचतारांकित एमआयडीसीमधील वार्षिक ६० हजार टन कास्टिंग उत्पादनक्षमता असणारे नवीन युनिट लवकर सुरू होत आहे. उत्पादित मालाला साठ टक्के भारतीय बाजारपेठेत मागणी आहे; तर चाळीस टक्के उत्पादन निर्यात केले जाते. प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ, रामप्रताप झंवर यांच्या नावाचे भारतीय बाजारपेठेत निर्माण झालेले वलय नरेंद्र झंवर यांची अचूक निर्णयक्षमता आणि नीरज व रोहन यांनी योग्य वेळेत स्वीकारलेली जबाबदारी या झंवर उद्योगाच्या जमेच्या बाजू आहेत. 

अत्याधुनिक यंत्रणा
झंवर उद्योग समूहाच्या फाउंड्री विभागात हाय प्रेशर मोल्डिंग लाइन, सायमलटेनिअस जोल्ट क्विझ मोल्डिंग मशिन, सॅण्ड रिक्‍लेमेशन प्रकल्प, इंडक्‍शन फर्नेस, कोल्ड बॉक्‍स कोअर मेकिंग, कोअर शूटिंग आदी आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित यंत्रसामग्री आहे. याव्यतिरिक्त दहा मशिन शॉपमध्ये असंख्य सीएनसी, व्हीएमसी, एचएमसी, एसपीएम अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित मशिनरीचा समावेश आहे. गुणवत्ता तपासणीसाठी अद्ययावत संगणकीकृत यंत्रसामग्रीही उपलब्ध आहे. 

कोल्हापुरातील सर्वांत मोठ्या उद्योगसमूहात गेली तेवीस वर्षे काम करत आहे. शिस्त, दर्जा, निर्णयक्षमता आणि स्पर्धात्मक युगात असणारी लवचिकता अशा अनेक गुणांनी परिपूर्ण समूहात काम करताना तीन पिढ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे.
- दत्ता सावंत,
सिस्टीम आणि एक्‍स्पोर्ट विभागाचे प्रमुख.

समूहाची महत्त्वाची उत्पादने
ऑटोमोटिव्ह कांपोनंटस्‌ , ब्रेक ड्रम, फ्लायव्हील, मिनीफोल्ड, ब्रेक डिस्क, प्रेशर प्लेट, ब्रेक हब, ऑईल कूलर कव्हर, हाउसिंग व ट्रॅक्‍टर कांपोनंटस्‌सह असंख्य प्रकारच्या स्पेअर पार्टस्‌च्या उत्पादनात झंवर उद्योगाची चौफेर घोडदौड सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com