तेरा महिन्यांत निधीअभावी विकासकामांचे तीन-तेरा...

सुनील पाटील
बुधवार, 7 मार्च 2018

कोल्हापूर - जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करून १३ महिने झाले. अजूनही विकासकामांचा नारळ फुटला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील अनेक सदस्य नाराजीचा सूर आळवत असताना विरोधकही शांत आहेत. जिल्हा परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. 

कोल्हापूर - जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करून १३ महिने झाले. अजूनही विकासकामांचा नारळ फुटला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील अनेक सदस्य नाराजीचा सूर आळवत असताना विरोधकही शांत आहेत. जिल्हा परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. 

जि.प.त सत्ता स्थापन करण्यासाठी ईर्षा लागली होती. या ईर्षेत भाजपने मुसुंडी मारली. सत्ता भाजपची असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सत्ताधाऱ्यांना धारेवर धरून चांगले काम करून घेतील, अशी अपेक्षा होती. 

भाजपच्या सदस्यांनी निवडणूक लढवितानाच कारभार पारदर्शी आणि समन्यायी पद्धतीने करणार असल्याची ग्वाही दिली. 
आता भाजपचे सदस्य निधी मिळत नाही म्हणून चर्चा करत आहेत. तर, विरोधकांना जिल्हा परिषदेत काय चाललंय, हे विचारण्याचीही गरज वाटत नाही, असे चित्र आहे. निधी नाही म्हणून सदस्यांचा हिरमोड झाला आहे.

आरोग्य विभागातील औषध घोटाळ्यामुळे सर्वसामान्य नागरिक चर्चा करू लागला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी एक आणि पदाधिकारी एक, असे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची वेगवेगळी मते आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत कोणाचा पायपोस कोणाला नाही, असेच चित्र आहे. सत्तेतील काही सदस्य आम्हाला निधी मिळत नाही, आम्ही काही बोलू शकत नाही. असे सांगत फिरत आहेत; पण विरोधकांनीही तोंड का बंद केले आहे. 

जिल्ह्याचा अपेक्षाभंग 
जिल्हा परिषदेत अनेक सदस्य उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या या शिक्षणाची जिल्ह्यात आदर्शवत योजना राबविण्यासाठी मदत होईल. त्यांच्याकडून कोणतीही चांगले विचार समोर येतील, अशी अपेक्षा ठेवून आलेल्या जिल्ह्याचा अपेक्षाभंग झाला. शासनाने निधी दिला पाहिजे. त्या निधीचे योग्य वाटप झाले पाहिजे. वाटप झालेला निधी योग्य कारणाला लागला की नाही, याची चौकशी सदस्य तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहिजे. मात्र, दोन महिन्यांपासून औषध घोटाळा गाजत असताना पदाधिकाऱ्यांना या घोटाळ्याची भणक नसल्याचे सांगितले जाते.

Web Title: Kolhapur News ZP budget issue