कोल्हापूर जिल्हा परिषदेचा तेरा कोटी रुपयांचा खर्च संशयाच्या भोवऱ्यात...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

कोल्हापूर - जि. प. समाजकल्याण विभागाने दलित वस्ती सुधारण्यासाठी केलेला सुमारे १३ कोटी रुपयांचा खर्च संशयाच्या भोवऱ्यात आहे. वेळेत निधी खर्च न करणे, मुदत संपूनही कामे सुरूच ठेवणे, गावनिहाय दलित वस्ती खर्चाचा तपशील न ठेवणे, झालेल्या कामांची तपासणी न करणे आदी कारणास्तव हा सर्व खर्चच आक्षेपार्ह असल्याचा ठपका लेखापरीक्षणाच्या अहवालात ठेवला आहे.

ग्रामीण भागात दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत रस्ते, गटर्स, पाणीपुरवठा विहिरींची दुरुस्ती, समाजमंदिरे आदी कामे घेतली जात आहेत. मात्र अशी कामे घेण्यापूर्वी विकासनिहाय बृहत आराखडा तयार करणे आवश्‍यक होते. त्यानुसार जि. प. समाजकल्याण विभागाने २०१४-१५ ते १८-१९ असा पाच वर्षांचा १८९४ वस्तींचा विकास आराखडा तयार केला. 

मात्र, जो सदस्य अधिक प्रभावी आहे, अशाच सदस्यांच्या मतदारसंघातील दलित वस्तीत दुबार कामे केली. त्यामुळे आतापर्यंत हजाराहून अधिक दलित वस्तीत कामेच झालेली नाहीत, हे वास्तव आहे. 

वर्ष              कामांची संख्या     अपूर्ण कामे
२०१४-१५      २१२               १० 
२०१५-१६      २९९             २९० 
२०१६-१७      २०२              प्रगतीत

लेखापरीक्षण विभागाकडून साधारण जून-जुलै महिन्यात लेखापरीक्षण होते; तर बांधकामाची कामे त्यानंतर पूर्ण केली जातात. अपूर्ण कामांची माहिती संकलित करणे सुरू आहे. काही ठिकाणी या वस्तीबाहेर ही योजना राबवली जाते. असा झालेला खर्च वसूल केला जाईल.
- चंद्रकांत सूर्यवंशी,
जिल्हा समाजकल्याण अधिकारी

अधिकाऱ्यांकडून नोंद नाही
कामांचा कालावधी वर्षाचा असताना ३०० कामे वर्षांहून अधिक काळ सुरूच आहेत. दलित वस्तीत झालेल्या कामांची तपासणी ही जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे. मात्र अधिकाऱ्यांनी कामांची तपासणी केलेली नाही. प्रत्येक दलितवस्तीनिहाय कामांचा तपशील व खर्चांची नोंद ठेवणे आवश्‍यक होते. मात्र ती तसदी या विभागाने घेतलेली नाही.

Web Title: Kolhapur News ZP Funds expenditure issue