कोल्हापूर-निपाणी रस्ता बंदच; महामार्गावर दोन फूट पाणी

राजेंद्र हजारे
रविवार, 11 ऑगस्ट 2019

' महामार्गावरील सर्वच पाणी संपेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचा आदेश वरिष्ठांनी दिला आहे. रविवारी सायंकाळपर्यंत सर्वच पाणी रस्त्यावरून निघून जाईल असा अंदाज आहे. त्यानंतर सोमवारी दिवसभर रस्त्याची स्वच्छता आणि नुकसानीची माहिती घेऊन डागडुजी केली जाईल. त्यानंतर सायंकाळी अथवा मंगळवारपासून ओव्हरलोड वाहने वगळता सर्व वाहनांना प्रवेश येण्याची शक्यता आहे. 
- एच. डी. मुल्ला, उपनिरीक्षक, निपाणी शहर पोलीस ठाणे

निपाणी : वेदगंगा नदीच्या पुराचे पाणी पात्रा बाहेर पडून गेल्या सहा दिवसांपासून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगरणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहत होते. त्यामुळे कोल्हापूर निपाणी महामार्ग वरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. दोन दिवसात परिसरात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे महामार्गावरील पाणीपातळी रविवारी(ता.११) दोन फुटावर आली होती. त्यामुळे वाहनधारकांना सुटकेचा निश्वास सोडला आहे. रविवारी दिवसभर पाणी ओसरले तरी रस्त्याची स्वच्छता आणि ऑडिट झाल्यानंतरच दुसऱ्या दिवशीपासून वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तब्बल ७२ नॉन स्टॉप महामार्ग बंद राहिला. 

गेल्या काही वर्षाच्या इतिहासामध्ये यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात वे गंगा नदीला पाणी आले आहे. यमगरणी येथील जुन्या फुलांच्या बरोबरीने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी या पुला शेजारीच उंचीवरचा पूल बांधण्यात आला आहे. या पुलावर अजून एकदाही पाणी आले नसून पुढील बाजूस सकल असलेल्या रस्त्यावरून यंदा मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दोन दिवसापासून रस्त्यावर पाणी उतरत असून दहा फुटांवरून आता दोन फुटावर पातळी आहे. तरीही असलेली पाणी पातळी स्थिर असल्याने रविवारी दिवसभर पाणी कमी होण्याची शक्यता नाही. त्याचप्रमाणे रस्त्यावरील सर्वच पाणी निघून गेल्यानंतर पुंज लॉईड आणि प्रशासकीय यंत्रणा द्वारे रस्त्याचे स्वच्छता केली जाणार आहे. शिवाय गेल्या सहा दिवसांपासून रस्ता पाण्‍यात राहिल्‍याने तो अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे खचण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पाणी ओसरल्यानंतर पाण्याखाली राहिलेल्या सर्वच रस्त्याची पाणी करून योग्य ती डागडुजी केल्यानंतरच प्रशासनाच्या आदेशानंतर वाहतूक सुरळीत केली जाणार आहे. रस्त्यावरून पाणी कमी झाले असले तरी  परिसरात शेतीवाडी जाणाऱ्या नागरिकांनाही या रस्त्यावरून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे . परिणामी सर्वच वाहनधारकांना अद्याप एक ते दोन दिवस रस्ता खुला होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. 

' महामार्गावरील सर्वच पाणी संपेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचा आदेश वरिष्ठांनी दिला आहे. रविवारी सायंकाळपर्यंत सर्वच पाणी रस्त्यावरून निघून जाईल असा अंदाज आहे. त्यानंतर सोमवारी दिवसभर रस्त्याची स्वच्छता आणि नुकसानीची माहिती घेऊन डागडुजी केली जाईल. त्यानंतर सायंकाळी अथवा मंगळवारपासून ओव्हरलोड वाहने वगळता सर्व वाहनांना प्रवेश येण्याची शक्यता आहे. 
- एच. डी. मुल्ला, उपनिरीक्षक, निपाणी शहर पोलीस ठाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Nipani road closed till on 72 hours