पेन्सिलीच्या छटांतून कोल्हापूरचे चित्रदर्शन

पेन्सिलीच्या छटांतून कोल्हापूरचे चित्रदर्शन

रमण मळा - प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल आहे. त्यातून फोटो नाही. रंग कुंचला नाही, तरीही समोरचे दृश्‍य केवळ पेन्सिलीच्या हलक्‍याशा फटकाऱ्यानिशी साकारायचे कसब कोल्हापूरातल्या काही जणांनी जपले आहे. पेन्सिलीच्या छटातून त्यांनी कोल्हापूरतल्या काही जणांनी जपले आहे. पेन्सिलीच्या छटातून त्यांनी कोल्हापूर शहराचे अंतरंग कागदावर उमटवले आहे. 

दर पंधरा दिवस, महिन्यांनी एकत्र यायचे. शहरातल्या एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी बसायचे आणि त्या वर्दळीआड असलेल्या कोल्हापूरचे चित्रबद्ध दर्शन घडवायची त्यांची धडपड आहे. या धडपडीतून एक अनोखे रेखाचित्रातले कोल्हापूर त्यांनी साकारले आहे.

रेखाटन ही कोल्हापूरातील हौशी कलाकारांची संस्था आहे. या संस्थेशी संबधित सर्वजण या रेखाचित्रात सहभागी होतात. ते रेखाटनातून व्यक्तीचित्रे साकारतात. पण त्याहीपेक्षा त्यांचा भर कोल्हापूरातील रस्ते, वास्तू, मंदिरे, नदीघाठ यावर आहे. वरवर जीर्ण व जुन्या झालेल्या कोल्हापुरातील अनेक वास्तू त्यांनी रेखाचित्रातून जिवंत केल्या आहेत. 

साधारण प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सकाळी ते सर्वजण एकत्र येतात. तत्पुर्वी त्यांनी रेखाटनाची जागा निश्‍चित केलेली असती. स्केचवही व  पेन्सिल घेऊन ते विशिष्ट अँगल घेऊन बसतात. व एकेक फटाकाऱ्यानिशी समोरची वास्तू, रस्ता तिथली वर्दळ कागदावर उमटवतात. 

आर्किटेक्‍ट मिलींद रणदिवे यांच्या पुढाकाराने रेखाटन या संस्थेचे काम चालते.ते म्हणाले,‘ अनुजा कदम, ॲशर फिलीप, हेमा कुलकर्णी, राहूल रेपे, निनाद कुलकर्णी, अभिनंदन मगदुम हे आमचे कलाकार आहे.’’

कोल्हापुरातील अनेक रस्ते, वास्तू, चौक, घाट, शेतवड, गुऱ्हाळ, मंदिरे, रंकाळा उद्याने अशी आहेत, ती पाहून रेखाटनाचा मोह आवरत नाही. जुन्या काळातील अनेक वास्तूंचा डौल इतका सुंदर आहे, की या वास्तूंमुळे कोल्हापूरलाही शोभा आली आहे. काळाच्या ओघात या वास्तू पडणार आहेत किंवा त्या जागी नवीन बांधकाम होणार आहे. त्यामुळे आम्ही रेखाचित्रांतून या वास्तू जपण्याचा प्रयत्न केला आहे.’’
- मिलिंद रणदिवे,
आर्किटेक्‍ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com