कोल्हापुरकरांनो, घाबरू नका आम्ही आहोत; पोलिसांचे आश्वासन 

police
police

कोल्हापुरातील पूर परिस्थितीतून नागरिकांचा बचाव करण्यामध्ये पोलिसांना पूर्णपणे यश येत आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांचा बचाव करण्यात आलेला आहे.

नागरिकांना पुरातून वाचल्यानंतर त्यांच्या मागे राहिलेल्या मालमत्तेबाबत काळजी वाटणे साहजिक आहे, परंतु कोल्हापूर पोलीस दलातर्फे आम्ही आपणास आश्वस्त करू इच्छितो की आपली मालमत्ता, आपली घरे पूर्णपणे सुरक्षित असून आवश्यक तो पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. जर कोणी त्या ठिकाणी चोरी अथवा इतर प्रकारचे गुन्हे करण्याची प्रयत्न करेल तर त्यास पकडून कठोर कारवाई व जरूर ते शासन केले जाईल.

रेस्क्यु करून मोकळे झालेल्या विभागामध्ये पोलिसांचा बंदोबस्त, फिक्स पॉईंट, गस्त ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सदर ठिकाणी कोणीही संशयित इसम आढळून आल्यास त्यास ताब्यात घेऊन कारवाई केली जाईल.

कसबा बावडा, पवार मळा, सिद्धार्थ नगर, खानविलकर बंगला, हरी पूजा पुरम, डायमंड हॉस्पिटल, पुनाळकर मळा, सन सिटी अपार्टमेंट, रमणमळा, जावडेकर स्कीम त्याचप्रमाणे बापट कॅम्प, मुक्त सैनिक वसाहत या भागांमध्ये नागरिकांना पुरातून पाण्याच्या पायातून बाहेर काढल्या नंतर मागे राहिलेल्या त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षित करता पोलिसांची गस्त वाढवण्यात आलेली आहे, त्यामुळे नागरिकांनी निश्चिंत राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये.

काही समाजकंटक जाणीवपूर्वक प्रशासनावर व पोलिस दलावर ताण पडावा व पोलिस कर्मचारी रात्रीची वेळी अडकून पडून महत्त्वाच्या अशा बचाव कार्यामध्ये अडथळा निर्माण व्हावा या दुष्ट हेतूने बचाव कार्य नंतर मोकळ्या झालेल्या इमारतींमध्ये चोऱ्या होत असल्याच्या अफवा समाज माध्यमाद्वारे पसरवत आहेत, त्यामुळे आपण त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कोल्हापूर पोलिस दल आपले व आपल्या मालमत्तांचे संरक्षण करण्यास समर्थ आहे. रिकाम्या झालेल्या इमारतींच्या आसपास आढळून येणाऱ्या प्रत्येक संशयित इसमांवर कारवाई करण्यात येईल. त्याची झडती घेण्यात येईल, याची दक्षता घेण्यात येत आहे.

परिसरातील नागरिकांना देखील असे आवाहन आहे, की कोणी बाहेरील व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आल्यास अथवा काही चीज वस्तू घेऊन जाताना मिळाल्यास त्यास पकडून तात्काळ पोलिसांना कळवावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com